(फोटो सौजन्य: Pinterest)
कधी सुरु होईल यात्रा?
ही संपूर्ण यात्रा ९ ते १० दिवसांची असेल ज्यात तुम्हाला सर्व ठिकाणी मनसोक्तपणे फिरता येतील. ही स्पेशल ट्रेन ४ ऑगस्ट २०२६ ला सिकंदराबाद रेल्वे स्टेशनपासून सुरु होईल आणि इथून ती सर्व ठिकाणी जाईल.
कोणकोणत्या ठिकाणांना भेट देता येईल?
या पॅकेजच्या मदतीने भाविकांना देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांची सैर करण्यात येईल.
आपल्या यात्रेची ही बुकिंग तुम्ही तुमच्या बजेट आणि सोयीनुसार करु शकता. या टूर पॅकेजमध्ये यात्रेकरुंना आपल्या खाण्या-पिण्याची गरज करायची गरज लागणार आहे. हे एक ‘ऑल-इंक्लूसिव’ पॅकेज असणार आहे ज्यात तुमच्या राहण्याचीही सोय केली जाईल.प्रत्येक व्यक्तीनुसार खर्च खालीलप्रमाणे असेल:
बुकिंग कशी करावी?
तुम्हालाही जर या टूर पॅकेजचे बुकिंग करायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या यात्रेची बुकिंग करु शकता. ऑनलाइन तिकिट बुकिंगसाठी irctctourism.com या वेब साईटला भेट द्या. ट्रेनमध्ये फक्त ७०२ सीट्स उपलब्ध असतील ज्यामुळे आपली बुकिंग वेळेत करा. यात स्लीपलसाठी १६० सीट्स तर थर्ड एसीसाठी ४९० सीट्स आणि सेकंड एसीसाठी ५२ सीट्स उपलब्ध असतील.






