Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fish Recipe: मासेप्रेमींसाठी खमंग मेजवानी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी फ्राय, पाहतच क्षणी तोंडाला पाणी

जेवणाच्या ताटात कायमच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही कुरकुरीत कोळंबी फ्राय बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 22, 2026 | 08:00 AM
मासेप्रेमींसाठी खमंग मेजवानी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी फ्राय, पाहतच क्षणी तोंडाला पाणी

मासेप्रेमींसाठी खमंग मेजवानी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी फ्राय, पाहतच क्षणी तोंडाला पाणी

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात असंख्य मासेप्रेमी आहेत. मासे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा मासा म्हणजे कोळंबी. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कोळंबी सगळेच आवडीने खातात. कारण यामध्ये एकही काटा नसतो आणि चव सुद्धा चांगली लागते. कोळंबीपासून कोळंबी भात, कोळंबीचा रस्सा, कोळंबीचे कालवण, कोलंबीचं सुक्क इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये तयार होणारी कोलंबी फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली कोळंबी तुम्ही स्टार्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता. फ्राय केलेली कोळंबी आणि पुदिन्याची चटणी हे कॉम्बिनेशन खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. नेहमीच शाहाकारी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तयार होणारे कोळंबी फ्राय नक्कीच बनवू शकता. कोलंबी हा मासा केवळ चवीलाच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी माशांचे आहारात सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

फाटलेल्या दुधापासून काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा विकतसारखे मसाला पनीर, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • कोलंबी
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • मैदा
  • काळीमिरी पावडर
  • गरम मसाला
  • तेल
  • आलं लसूण मिरची पेस्ट
नेहमीच कांदापोहे- उपमा खाऊन कंटाळा आला? मग सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा बीटरूट इडली, नोट करा रेसिपी

कृती:

  • कुरकुरीत कोळंबी फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोळंबी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून कोळंबी मिक्स करा.
  • काहीवेळ कोळंबी झाकून ठेवल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि इतर मसाले घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • अर्धा तास मॅरिनेशन करून ठेवलेली कोळंबी तशीच ठेवून द्यावी. यामुळं माशांना व्यवस्थित मसाला लागतो आणि चव सुद्धा चांगली लागते.
  • ताटात मैदा, मीठ, काळीमिरी पावडर, लाल तिखट आणि हळद घालून व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. मसाला लावलेली कोळंबी पिठात घोळवून कढईमधील गरम तेलात फ्राय करण्यासाठी सोडा.
  • मंद आचेवर कोलंबी दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर काढून घ्या. सर्व्ह करताना त्यावर चाट मसाला टाकून खाण्यास द्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कुरकुरीत कोळंबी फ्राय.

Web Title: Instantly make crispy prawn fry in 10 minutes easy fish fry recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.