साहित्य :
कृती :
सुरुवातीला बटर फेटून घेणे. त्यानंतर क्रमाक्रमाने त्यात साखर, अंडी घालून भरपूर एकत्रित फेटणे. नंतर त्यात मैदा बेकिंग पावडर घालणे आणि मिश्रण पुन्हा फेटणे. मिश्रणात दूध घालून थोडेसे फेटून ते मिश्रण एकजीव होईल असे पाहणे. या मिश्रणात १/३ आणि २/३ असे दोन भाग करून वेगवेगळ्या भांड्यात काढून घेणे.१/३ भागात वॅनिला अर्क घालणे आणि ढवळणे. दुसऱ्या भागात म्हणजे २/३ भागात कोको+कॉफी घालून ढवळणे.
केक मोल्डला बटर लावून घेणे. दोन-तीन चमचे वॅनिला घातलेले केकचे मिश्रण, दोन-तीन चमचे कोकोवाले मिश्रण असे करत सर्व मिश्रण घालणे.
१८० अंश सें. ला ३० ते ३५ मिनिटे ओव्हन मध्ये बेक करणे. केक तयार झाल्यास त्याला साधारण ५ मिनिटे ओव्हन मध्येच राहू देणे. नंतर केक मोल्डमधून काढून जाळीवर घालणे. गार झाल्यावर गार्निशिंगसाठी व्हाईट चॉकलेट किसून घालणे. अशा प्रकारे स्वादिष्ट असा कॉफी केक तयार होतो.