
ख्रिसमसला केक बनवण्याऐवजी घरच्या घरी झटपट बनवा चविष्ट चॉकलेट बर्फी
नाताळ सणाचा उत्साह वाढवण्यासाठी घरात सुंदर सुंदर पदार्थ बनवले जातात. २५ डिसेंबरला नाताळ सण साजरा केला जातो. दरवर्षी घरात वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेले केक, चॉकलेट आणि इतर अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. पण कायमच केक खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट बर्फी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. यामुळे शरीराला असंख्य फायदे सुद्धा होतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा चॉकलेटचे सेवन करू शकता. सणावाराच्या दिवशी कायमच विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण विकतच्या पदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे घरीच बर्फी बनवावी. चला तर जाणून घेऊया चॉकलेट बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)