Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Intermittent Fasting म्हणजे काय? आरोग्यासाठी वरदान की धोका? वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर

Intermittent Fasting Benefits: इंटरमिटंट फास्टिंग हा ट्रेंड वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. मात्र त्याचे फायदे आणि दुष्परिणाम समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तो योग्य पद्धतीने अवलंबता येईल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 21, 2026 | 07:53 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • Intermittent Fasting म्हणजे काय?
  • आरोग्यासाठी वरदान की धोका?
  • वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर
आजकाल वजन कमी करणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे यासाठी इंटरमिटंट फास्टिंग (Intermittent Fasting) हा आहाराचा प्रकार मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. अनेक सेलिब्रिटी, फिटनेस तज्ज्ञ आणि आरोग्यप्रेमी याचा अवलंब करताना दिसतात. मात्र इंटरमिटंट फास्टिंग नेमके काय आहे, त्याचे फायदे कोणते आणि त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात, याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात.

Mental Health: तणाव कमी करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी, मानसिक आरोग्य सुधारेल

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटंट फास्टिंग हा कोणता विशिष्ट आहार नसून खाण्याची एक पद्धत आहे. यामध्ये ठराविक कालावधीत अन्न सेवन केले जाते आणि उर्वरित वेळ उपवास केला जातो. सर्वाधिक लोकप्रिय पद्धतींमध्ये १६:८ नियमाचा समावेश होतो. यामध्ये १६ तास उपवास केला जातो आणि ८ तासांच्या कालावधीत जेवण घेतले जाते.

वजन कमी होण्यास मदत

उपवासाच्या काळात शरीर साठवलेल्या चरबीचा ऊर्जा म्हणून वापर करू लागते. त्यामुळे वजन आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते.

रक्तातील साखरेचे नियंत्रण

काही अभ्यासांनुसार इंटरमिटंट फास्टिंगमुळे इन्सुलिन सेसिंटिव्ह सुधारू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

पचनसंस्थेला विश्रांती

सतत खाण्याऐवजी ठराविक वेळ उपवास केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि पचनक्रिया अधिक कार्यक्षम होऊ शकते.

हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक

कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि शरीरातील दाह कमी करण्यास मदत झाल्यास हृदयविकारांचा धोका कमी होऊ शकतो.

मानसिक एकाग्रता वाढण्यास मदत

काही लोकांच्या अनुभवांनुसार इंटरमिटंट फास्टिंगमुळे एकाग्रता, मानसिक सतर्कता आणि ऊर्जेची पातळी सुधारू शकते.

इंटरमिटंट फास्टिंगचे संभाव्य दुष्परिणाम

  • सुरुवातीच्या काळात तीव्र भूक लागणे, चिडचिड होणे किंवा थकवा जाणवू शकतो.
  • दीर्घकाळ अन्न न घेतल्यामुळे काहींना डोकेदुखी, अशक्तपणा किंवा चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते.
  • खाण्याच्या वेळेत संतुलित आहार घेतला नाही तर शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी पडू शकतात.
  • गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता, लहान मुले तसेच काही वैद्यकीय समस्यांनी ग्रस्त व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इंटरमिटंट फास्टिंग सुरू करू नये.
इंटरमिटंट फास्टिंग ही वजन नियंत्रण आणि आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त पद्धत ठरू शकते. मात्र ती प्रत्येकासाठी सारखीच फायदेशीर असेल असे नाही. त्यामुळे ही पद्धत सुरू करण्यापूर्वी आपल्या आरोग्यस्थितीनुसार वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यांची जोड दिल्यास इंटरमिटंट फास्टिंगचे अधिक चांगले परिणाम मिळू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Money Plant: घरातील मनी प्लांट सुकतोय? वापरा ‘या’ सोप्या टिप्स, होईल हिरवेगार

Web Title: Intermittent fasting benefits weight loss health diet side effects guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • benefits of fasting
  • lifestyle news in marathi
  • weight loss tips

संबंधित बातम्या

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!
1

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.