
पर्यटकांसाठी IRCTC घेऊन आला 'फुल पैसे वसूल' टूर पॅकेज, 16,000 हून कमी पैशात करता येईल रामेश्वरसह 7 मोठ्या मंदिरांचे दर्शन
तुम्हीही धार्मिक पर्यटन करण्याचा विचार केला असेल तर इंडियन रेलवे कॅटरिंग एंड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC) तुमच्यासाठी एक खास संधी घेऊन आला आहे. ‘भारत गौरव टूरिस्ट ट्रेन’ च्या मदतीने पर्यटकांना एक खास टूर पॅकेड ऑफर केले जात आहे ज्यात कमी किमतीत ७ मोठ्या मंदिरांची भेट करुन दिली जाईल. मुख्य म्हणजे यात सर्व सोयीसुविधांचा समावेश असेल. याचाच अर्थ तुम्ही हे टूर पॅकेज बुक केल्यानंतर तुम्हाला राहण्याची, खाण्या-पिण्याची कसलीच काळजी करण्याची गरज लागणार नाही. चला पॅकेजविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पॅकेजची माहिती
IRCTC ने लाँच केलेल्या या पॅकेजचे नाव ‘दिव्य दक्षिण यात्रा विद अरुणाचलम’ असे आहे. याचे संपूर्ण शेड्यूल जाणून घेऊया.
या प्रवासाचा मुख्य मार्ग तेलंगणातील सिकंदराबाद इथून होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी इतर अनेक स्थानकांवरूनही चढण्या-उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही सिकंदराबाद ऐवजी जंगांव, काजीपेट, वारंगल, महबूबाबाद, खम्मम, माधिरा, विजयवाड़ा, तेनाली, ओंगोल, नेल्लोर, गुडूर आणि रेनिगुंटा रेल्वे स्टेशनपासून या यात्रेची सुरुवात करु शकता, म्हणजेच रेल्वेत बसू शकता.
या ७ धार्मिक स्थळांचे केले जाणार दर्शन
Embark on a soul-stirring journey through the sacred temples and timeless heritage of South India with IRCTC’s Bharat Gaurav Tourist Train – Divya Dakshin Yatra with Arunachalam.https://t.co/GKHvUK1KQJ(package Code=SCZBG63)#Tamilnadu @RailMinIndia pic.twitter.com/hZkKZUXCKq — IRCTC Bharat Gaurav Tourist Train (@IR_BharatGaurav) June 2, 2026
किती खर्च होईल?
IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये वेगवेगळ्या क्लास आणि वयाच्या हिशोबाने तिकिटाची किंमत निश्चित करण्यात आली आहे.
प्रौढ भाडे (प्रति व्यक्ती)
कोणकोणत्या सुविधा असतील
IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये फक्त तुमच्या प्रवासाचा नाही तर राहण्याचा आणि खाण्या-पिण्याचा देखील खर्च केला जाईल. यात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश असेल. सुरक्षेसाठी सर्व यात्रेकरुंना ट्रॅव्हल इनशाॅरंस देखील देण्यात येईल. पॅकेजची बुकिंग करण्यासाठी तुम्ही irctctourism.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. इथे पॅकेजची सर्व माहिती देखील उपलब्ध असेल.