
थंडीमुळे त्वचा खूप जास्त काळी झाली आहे? मग 'या' पदार्थांचा वापर करून चेहऱ्यावर आणा नैसर्गिक ग्लो
चेहऱ्यावर तरुण वयात सुरकुत्या का दिसतात?
त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर कोणत्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा?
त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय?
वर्षाच्या बाराही महिने सर्वच महिलांना त्वचेसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवू लागतात. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, पिंपल्स, फोड, मोठे मोठे फोड, वांग, सुरकुत्या इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी वेगवेगळे फेसपॅक, फेसमास्क इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. पण यामुळे चेहऱ्यावर कोणताच परिणाम दिसून येत नाही. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर काहीवेळा महिला दुर्लक्ष करतात, मात्र यामुळे त्वचा आणखीनच खराब आणि निस्तेज होण्याची शक्यता असते. तसेच वाढत्या थंडीमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. अन्यथा त्वचेवर टॅनिंग वाढून चेहरा काळा दिसू लागतो.(फोटो सौजन्य – istock)
त्वचा कायमच तरुण आणि हेल्दी ठेवण्यासाठी त्वचा हायड्रेट, मॉईश्चराईज आणि ग्लोईंग ठेवणे आवश्यक आहे. पण कामाच्या धावपळीमध्ये त्वचेची जास्त काळजी घेतली जात नाही. केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा काहीकाळापुरतीच अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. पण कालांतराने त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर त्वचा अतिशय रुक्ष आणि काळवंडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोणते पदार्थ लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ नियमित लावल्यास चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार दिसेल.
त्वचा कायमच हायड्रेट आणि मॉईश्चरायज ठेवण्यासाठी विटामिन ई ऑईलचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी हातांवर दोन ते तीन थेंब विटामिन ई ऑइल घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे त्वचा खूप जास्त सॉफ्ट होते आणि त्वचेवर ग्लो येतो. त्वचेचा रंग उजळदार करण्यासाठी विटामिन ई ऑईलचा वापर करावा.
त्वचा नैसर्गिकरित्या मॉईश्चरायजर आणि हायड्रेट ठेवण्यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या आणि डेड स्किन कमी करण्यासाठी ग्लिसरीन अतिशय प्रभावी ठरते. याशिवाय तुम्ही जोजोबा तेलाचा सुद्धा वापर करू शकता. या तेलात मॉईश्चरायजिंग आणि अँटीएजिंग गुणधर्म आढळून येतात. यामुळे जोजोबा तेलाच्या वापरामुळे त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा अतिशय सुंदर दिसते.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचेवरील मऊपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जात आहे. गुलाब पाणी त्वचा हायड्रेट आणि सुंदर ठेवते. याशिवाय मेकअप करण्याआधी गुलाब पाणी चेहऱ्यावर लावल्यास त्वचा हायड्रेट राहील आणि चेहऱ्यावरील मेकअप निघून येणार नाही.