Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Panchamrut Recipe : जन्माष्टमीच्या पूजेत पंचामृताला विशेष महत्त्व असते. मात्र योग्य प्रमाण न पाळल्यास पंचामृताची चव आणि पोत बिघडू शकतो. यासाठी 1:2:4:8:16 हे सोपे प्रमाण लक्षात ठेवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2026 | 08:15 PM
Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Follow Us
Follow Us:
  • 1:2:4:8:16 प्रमाणात तूप, मध, मिश्री, दही आणि दूध घ्या.
  • ताजे दही आणि गाईचे दूध वापरल्याने पंचामृताची चव चांगली येते.
  • सर्व साहित्य व्यवस्थित फेटून शेवटी तुळशीची पाने घाला.
जन्माष्टमीचा पवित्र सण पंचामृताशिवाय अपूर्ण मानला जातो. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्रीकृष्णाच्या पूजेपासून ते अभिषेकानंतरच्या प्रसादापर्यंत पंचामृताची गरज ही नक्कीच भासते. या दिवशी पंचामृताला विशेष महत्त्व असते ज्यामुळे अनेकांच्या घरी ते तयार केले जाते. तथापि, पंचामृत बनवताना अनेकांना याचे योग्य प्रमाण लक्षात येत नाही ज्यामुळे पंचामृत कधी फार पातळ तयार होतो तर कधी त्याची चवच बिघडते.

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

तुम्हालाही पंचामृत तयार करताना अडचणी येत असतील किंवा योग्य पद्धतीने पंचामृत कसा तयार करावा ते समजत नसेल तर तुम्ही 1:2:4:8:16 फाॅर्म्यूल्याची मदत घेऊ शकता. हे प्रमाण लक्षात घेऊन जर पंचामृत तयार केले तर ते फक्त चविष्टच बनत नाही तर त्याला पोतही चांगला येतो. चला तर मग पंचामृत तयार करण्याची सीक्रेट पद्धत जाणून घेऊया.

काय आहे 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला?

  • पंचामृत तयार करताना अनेकजण याच्या प्रमाणात घोळ घालतात. यामुळेच खाली दिलेले प्रमाण तुमच्यासाठी योग्य ठरेल.
  • १ चमचा: शुद्ध गाईचे तूप
  • २ चमचे: शुद्ध मध
  • ४ चमचे: बारीक मिश्री (किंवा साखर)
  • ८ चमचे: ताजे दही
  • १६ चमचे: कच्चे गाईचे दूध
चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

भांड्याची निवड

  • पंचामृत तयार करण्यासाठी चांदी, पितळ किंवा काचेच्या भांड्याचा वापर करा.
    यात सर्वात आधी गाईचे शुद्ध तूप टाका.
  • यानंतर यात २ चमचे शुद्ध मध घाला. चमच्याच्या साहाय्याने मध आणि तूपाला व्यवस्थित फेटून घ्या.
  • आता यात ४ चमचे कुटलेली साखर घाला आणि मिक्स करा.
  • यानंतर यात ८ चमचे ताजी दही घाला आणि नीट फेटून घ्या. ताजे दही वापरा नाहीतर पंचामृताला आंबट चव येईल.
  • आता यात १६ चमचे गाईचे दूध मिक्स करा.
  • सर्व साहित्य भांड्यात टाकल्यानंतर एक चमच्याच्या साहाय्याने १-२ मिनिटे साहित्य चांगलेे फेटून घ्या.
  • साखर नीट विरघळली आणि पंचामृत चांगले स्मूद झाले की तुमचे पंचामृत तयार होईल.
  • शेवटी काही तुळशीची पाने यावर टाका आणि पूजेसाठी किंवा प्रसादासाठी याचा वापर करा.
  • अशाप्रकारे पंचामृत बनवाल तर निश्चितच याला स्वादिष्ट चव मिळेल.
 

Web Title: Janmashtami panchamrit 1 2 4 8 16 secret recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • food recipe
  • Krishna Janmashtami
  • marathi recipe

संबंधित बातम्या

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
1

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी
2

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने
3

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
4

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.