जपानी लोक रात्रीच आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागील ‘ही’ काही खास कारणे
जपानी लोक रात्री अंघोळ का करतात?
शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी काय करावे?
The Boundary Effect म्हणजे काय?
Japanese bathing culture: जगभरातील प्रत्येक देशाची स्वतःची एक अनोखी संस्कृती आणि जीवनशैली असते. जपानबद्दल बोलायचे झाल्यास, तिथल्या तंत्रज्ञानापासून ते लोकांच्या जीवनशैलीपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला आश्चर्यचकित करते. अलीकडेच, सोशल मीडियावर एक मनोरंजक चर्चा सुरू झाली आहे, जपानी लोक सकाळी अंघोळ करण्याऐवजी रात्री का करतात?
जपानमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेने या रहस्याचा उलगडा सोशल मीडियाद्वारे केला आहे. तिच्या व्लॉगद्वारे, तिने ‘ओफुरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अनोख्या स्नान संस्कृतीमागील चार प्रमुख आणि मनोरंजक कारणं सांगितली आहे. ती आपल्यालाही माहीत असावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा.
The Boundary Effect, म्हणजेच जपानी जीवनशैलीत, रात्रीची अंघोळ केवळ शरीर स्वच्छ करण्याचे साधन नाही, तर मानसिक शांतीचे साधन देखील आहे. शरीरावर कोमट पाणी पडताच, दिवसाचा ताण, ऑफिसमधील तणाव आणि मानसिक थकवा यांचं दार आपोआप बंद होते. हे कोमट पाणी मेंदूला संकेत देते की काम संपले आहे आणि आता आराम करण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे रात्री आंघोळ केली जाते.
तसंच जपानी लोकांना स्वच्छतेचे एक अनोखे वेड असते. ते ‘No Outside Dirt’ हे धोरण पाळतात. जपानी लोक दिवसाची धूळ, घाण, प्रदूषण आणि घाम घेऊन कधीही झोपायला जात नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की अस्वच्छ शरीराने झोपल्याने संपूर्ण घर आणि झोपण्याचे वातावरण प्रदूषित होते. त्यामुळे, ते रात्री अंघोळ करून आणि स्वतःला पूर्णपणे स्वच्छ केल्यावरच अंथरुणात जातात.
तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वाढत्या वयानुसार, विशेषतः वयाच्या ४० वर्षांनंतर, पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही ताठरपणा येणे, पाठदुखी आणि थकवा सामान्य आहे. या समस्येवर उपचार कसे करायचे हे जपानी लोकांना माहीत आहे. रात्री गरम पाण्याच्या टबमध्ये ज्याला ओफुरो असं म्हटलं जातं त्यात बसल्याने सर्व बंद झालेल्या नसा आणि स्नायू पूर्णपणे शिथिल होतात. शरीराचा सर्व ताठरपणा आणि वेदना त्वरित नाहीशा होतात, ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला अविश्वसनीयपणे ताजेतवाने वाटते.
आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जपानी महिलांच्या निर्दोष आणि तरुण त्वचेचे रहस्य या रात्रीच्या आंघोळीत दडलंय. जेव्हा तुम्ही रात्री गरम पाण्याने अंघोळ करता, तेव्हा शरीरात झोप आणणारे हार्मोन मेलाटोनिन स्रवते. जेव्हा तुम्ही गाढ आणि शांतपणे झोपता, तेव्हा त्वचेच्या पेशी स्वतःची दुरुस्ती करतात. यामुळेच सकाळी उठल्यावर त्यांची त्वचा ताजीतवानी, चमकदार आणि तरुण दिसते. तुम्हालाही जर हे फायदे हवे असतील तर तुम्ही ही पद्धत नक्कीच स्वीकारू शकता.






