जॉनी लीव्हरने केला धक्कादायक खुलासा! वयाच्या १० व्या वर्षी मुलाच्या मानेत झाला धोकादायक ट्यूमर
विनोदी कलाकार अभिनेता जॉनी लिव्हर त्याच्या अभिनयामुळे कायमच चर्चेत असतो. भारतातील विनोदी कलाकारांच्या यादीमध्ये जॉनी लिव्हरचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. तो केवळ भारतातच नाही तर जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. त्याचा अभिनय सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. संपूर्ण जगाला हसवणाऱ्या चेहऱ्यांमागे अनेक मोठी दुःख लपलेली असतात. मागील काही वर्षांपूर्वी जॉनी लिव्हर कौटुंबिक समस्या आणि वैयक्तिक संघर्षला सामोरे जात होत. स्वतःच्या मुलांच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग उद्भवला होता. वयाच्या 10 व्या वर्षी जेसी लिव्हरच्या मानेमध्ये ट्यूमर आढळून आला होता. हा ट्युमर अतिशय गंभीर असल्यामुळे त्याला कॅन्सरचे निदान झाले होते.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
पॉडकास्टमध्ये बोलताना जॉनी लिव्हर यांनी याबद्दल धक्कादायक खुलासा केला. मुलगा 10 वर्षांच्या असताना त्याच्या मानेत गाठ झाली होती. मानेवर तयार केलेली गाठ मोठी झाल्यामुळे अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये जेसीला ट्यूमर असल्याचे आढळून आले.त्यानंतर त्याच्यावर अनेक वेगवेगळे उपचार करण्यात आले. तसेच जेसीचे ऑपरेशनसुद्धा झाले. पण मानेवरील ट्युमर नसांना जोडलेला असल्यामुळे तो पूर्णपणे काढून टाकणे शक्य झाले. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णाला अंधत्व किंवा अर्धांगवायू येण्याची शक्यता वर्तवली होती.
जॉनी लिव्हरने सांगिल्यानुसार, जेसीला दररोज 40 ते 50 पेक्षा जास्त औषध दिली जात होती. डोळ्या औषधांच्या सेवनामुळे ट्यूमर वितळेल असे डॉक्टरांना वाटत होत. पण याउलट ट्युमर आणखीनच वाढत गेला. ट्युमर सतत वाढत असल्यामुळे जॉनीला असहाय्य वाटू लागले. तो म्हणाला, ‘एक वडील म्हणून मी जे काही करू शकलो ते सर्व केले… पण मी देव नाहीये.’
जेसी १२ वर्षांचा असताना संपूर्ण कुटुंबाला जॉनी लिव्हरने अमेरिकेतील जर्सी सिटी येथे सुट्टीसाठी फिरायला नेले होते. त्यावेळी तिथे असलेल्या एका चर्चला त्यांनी भेट दिली. जेसीची प्रकृती पाहून चर्चमधील एका पुजारीने जॉनीला विचारले आणि त्याला न्यू यॉर्कमधील स्लोन केटरिंग हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तसेच तिथे असलेल्या पुजाऱ्याने सांगितले होते की, देव त्याला बरे करेल.त्यावेळी भारताच्या डॉक्टरांनी हार मानली होती. पण जॉनीच्या अमेरिकेतील काही डॉक्टर मित्रांनी त्याला डॉक्टर जतीन शाह यांच्याकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. जेसीच्या ऑपरेशनसाठी जॉनी लिव्हर यांनी मनापासून प्रार्थना केली की तो स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित आहे. त्यानंतर तिथे असलेल्या डॉक्टरांनी त्याला सांगितले की संपूर्ण ट्यूमर काढून टाकण्यात आला आहे आणि मानेवर फक्त एक छोटीशी पट्टी बांधलेली आहे.
जेसीवर उद्भवलेल्या कठीण प्रसंगानंतर त्याने त्याच्या सर्व वाईट सवयी सोडून दिल्या. तसेच देवाचे सुद्धा आभार मानले. मुलाला जगण्याची दुसरी संधी दिल्याबद्दल देवाचे मनापासून आभार मानले. जेसी आता पूर्णपणे निरोगी आणि हेल्दी आहे. तो आता एक अभिनेतासुद्धा झाला आहे. कठीण काळात धैर्य आणि विश्वास असेल तर खूप मोठा चमत्कार दिसून येतो.