सकाळी उठल्यानंतर काहींना चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. तर काहींना दिवसभरात खूप वेळा चहा प्यावा.पण जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरते. कारण चहा बनवताना साखरेचा वापर केला जातो. साखरेमध्ये असलेले हानीकारक घटक रक्तातील साखरेची पातळी वाढवतात, ज्यामुळे मधुमेह होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चहा बनवताना साखर वापरण्याऐवजी कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी ठरतात. (फोटो सौजन्य – istock)
चहा बनवताना साखरेऐवजी घाला 'हे' पदार्थ! चवीसोबत आरोग्यालासुद्धा होईल फायदा
नैसर्गिक गोडवा असलेले मध आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. मधाचा वापर आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा केला जातो. चहा बनवताना मधाचा वापर केल्यास चला नैसर्गिक गोडवा येतो. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
गूळ हा पारंपरिक पदार्थ आहे. जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. गुळामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म चहाची चव वाढवतात. याशिवाय यामध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले जेष्ठमध शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते. औषधी वनस्पती शरीरासाठी कायमच प्रभावी ठरतात. जेष्ठमधाचा एक बारीक तुकडा चहामध्ये टाकल्यास सर्दी, खोकल्यापासून आराम मिळेल.
खजूरमध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे चहा बनवताना तुम्ही खजूर सिरपचा वापर करू शकता. खजूर सिरप चवीला अतिशय गोड असते.
नुका, खारीक किंवा अंजीर इत्यादी सुका मेवा दुधात मिक्स करून नंतर चहा बनवल्यास चव अतिशय सुंदर लागते. काहींना खूप जास्त गोड चहा प्यायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही सुकामेवा वापरून चहा बनवू शकता.