कलोंजीच्या बियांना इंग्रजीमध्ये ब्लॅक सीड्स (Black Seeds) अथवा नायजेला सीड्स (Nigella Seeds) असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलोंजीच्या बियांना, एक मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळ्खले जाते. भारतात सुकलेल्या कलौंजीच्या बिया भाजून त्याचा वेगवगेळ्या प्रकारे वापर केला जातो. समोसा, पापडी, कचोरीसारख्या अनेक खुशखुशीत पदार्थांमध्ये या कलोंजीच्या बियांचा वापर केला जातो. कलोंजीच्या बियांचा आपल्या आहारात समावेश समावेश करणे नक्कीच फायदेकारक ठरू शकते. या बियांमध्ये अनेक पोषकतत्वे आढळली जातात. या बियांचा फायदा आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठीही होऊ शकतो.
अशा प्रकारे करा कलोंजीच्या बियांचा वापर
आपल्या भारतीय मसाल्याची खासियतच ही आहे की, यांना कोणत्याही खाद्यपदार्थात वापरल्यास त्या खाद्यपदार्थाचा स्वाद द्विगुणित होतो. हे मसाले फक्त खाद्यपदार्थाचा स्वादच नाही वाढवत तर, हे आरोग्यासाठीही तितकेच पौष्टिक मानले जातात. कलोंजीबद्दल बोलायचे झाले तर, यांना एखाद्या खाद्यपदार्थामध्ये टाकल्याने फक्त त्या खाद्यपदार्थाचा स्वादचं नाही बदलत तर तो खाद्यपदार्थ दिसायलाही आकर्षक वाटतो. तुम्ही या बियांची पावडर बनवूनही याचा वापर करू शकता अथवा पाण्यात भिजवूनही हे वापरले जाऊ शकते.
[read_also content=”जंजिरा किल्ला पाहण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा! ‘या’ तारखेपासून किल्ला राहणार बंद https://www.navarashtra.com/maharashtra/murud-janjira-fort-in-raigad-will-be-closed-during-monsoon-due-to-the-water-barrier-maharashtra-tourism-nrpm-536051.html”]
कलोंजी बिया वापरण्याचे प्रकार
1. कलोंजीच्या बियांची पावडर तयार करून, एका ऐअरटाईट डब्यामध्ये याला साठवून ठेवा. ब्रेडवर नंतर बटर लावून त्यावर ही कलोंजी पावडर छिडकता येऊ शकते.
2. पनीरच्या स्लाइसेसना मॅरीनेट करून थोडं रोस्ट केल्यानंतर यावर ही पावडर छिडकल्याने, हे फक्त दिसायलाच नाही तर खायलाही अप्रतिम लागते.
3. अचारी दहीच्या तडक्यामध्ये कलोंजी बिया टाकल्याने याची चव द्विगुणित होते. याचप्रकारे तुम्ही तंदुरी रोटी, मठरी, ब्रेड अशा गोष्टींवरही याचे दाणे लावू शकता. असे केल्याने हे दिसायला अधिक चांगले आणि आकर्षित वाटेल.
4. भरलेली भेंडी, कार्ली अशा भाज्यांमध्ये लागणाऱ्या ,मसाल्यामध्येही तुम्ही याचा वापर करू शकता. अन्य मसाल्यांसोबत कलोंजीच्या बियांची पावडर भाजीत टाकल्याने याचा स्वाद कामालंच लागतो.
5. सलाड बनवतानाही त्यावरील ड्रेसिंगसाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये मीठ, काळी मिर्चीची पेस्ट आणि थोडीशी कलोंजी पावडर मिक्स करून टाका. याने सलाडचा स्वाद नक्कीच वाढेल.
6. आंब्याचं लोणचं किंवा चटणी बनवताना, कलोंजीचा वापर करा. एवढेच नाही तर भातात जिऱ्याचा तडका देतातानाही तुम्ही या कलोंजीच्या बियांचा वापर करू शकता. यासाठी जिऱ्यासोबतच या बियांनाही तडका द्या आणि हा तडक भातात टाकून द्या.
कलोंजीच्या बियांचे फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.