Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करण जोहरच्या ‘The Traitors’ शोचे शूटिंग जैसलमेरच्या या राजवाड्यात पार पडले; एक दिवसाचं भाडं द्यायला वर्षभराचा पगारही कमी पडेल

Suryagarh Palace: करण जोहरचा बहुचर्चित 'द ट्रेटर्स' शो जैसलमेरच्या आलिशान राजवाड्यात शूट झाला. इथेच बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचा विवाहसोहळाही पार पडला. हा पॅलेस सामान्य लोकांसाठीही खुला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 19, 2025 | 08:42 AM
करण जोहरच्या 'The Traitors' शोचे शूटिंग जैसलमेरच्या या राजवाड्यात पार पडले; एक दिवसाचं भाडं द्यायला वर्षभराचा पगारही कमी पडेल

करण जोहरच्या 'The Traitors' शोचे शूटिंग जैसलमेरच्या या राजवाड्यात पार पडले; एक दिवसाचं भाडं द्यायला वर्षभराचा पगारही कमी पडेल

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडचा फेमस दिग्दर्शक करण जोहर अलीकडे आपला नवीन शो ‘द ट्रेटर्स’ मुळे खूप चर्चेत आहे. हा एक गेम शो आहे ज्यात बॉलिवूड आणि सोशल मीडिया इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. या शोची एक खास गोष्ट म्हणजे याचे लोकेशन. आम्ही तुम्हाला सांगतो की, जैलसलमेरच्या एका आलिशान राजवाड्यात या शोचे शूटिंग पार पडले. इथे अनेक आलिशान सोई-सुविधा आणि आहेत. या राजवाड्याचे नाव सूर्यगढ पॅलेस असे आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Foodies साठी स्पेशल! भारताच्या या मॉलमध्ये हा देशातील सर्वात मोठा फूट कोर्ट; एक-दोन नाही तर इथे आहे अगणित फूड स्टॉल्स

जर तुम्हाला शाही ट्रिप करायची असेल आणि तुमचे बजेटही भारीभक्कम असेल तर सूर्यगढ पॅलेस तुमच्यासाठीच आहे. हे ठिकाण वेडिंग डेस्टिनेशनसाठीची खूप फेमस आहे. हे भारतातील सर्वात आलिशान आणि महागड्या हॉटेल्समध्ये या पॅलेसचा समावेश होतो. इथे तुम्ही शाही गोष्टींचा अनुभव घेऊ शकता आणि तुमची ट्रिप संस्मरणीय बनवू शकता. हे ठिकाण केवळ टीव्ही शूटिंगसाठीच नाही तर सामान्य लोकांसाठी देखील खुले आहे.

सूर्यगड पॅलेस

आपल्या भव्य वास्तुकलेमुळे सूर्यगढ पॅलेस अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. हे राजपुतानाच्या वारशाचे उत्तम प्रतिबिंब आहे. इथे प्रवेश करताच राजवाड्यातील प्राचीन भिंती तुम्हाला आपल्याकडे आकर्षित करतील. हॉटेलच्या भिंती पिवळ्या वाळूच्या दगडापासून बनवलेल्या आहेत, ज्या आपल्याला जुन्या काळाच्या वैभवाची आणि इतिहासाची आठवण करून देतात. जुन्या काळातील राजेशाही आणि आधुनिक काळातील सोयीसुविधांचे मिश्रण हे खास बनवते.

पिवळ्या दगडापासून बनवलेल्या या राजवाड्यात खोल्या आणि सुइट्स तसेच ५ व्हिला आहेत. तसेच इथे जैलसलमेर हवेली आणि थोर हवेली अशा दोन हवेल्या आहेत. जैसलमेर हवेली सुमारे १२०० चौरस फूट क्षेत्रात पसरलेली आहे. सूर्यगड हॉटेलमध्ये ८४ खोल्या आणि ९२ बेडरूम आहेत. हॉटेलमध्ये बावडी नावाचे एक ठिकाण आहे, जे विशेषतः लग्नाच्या फेऱ्यांसाठी डिझाइन केलेले आहे. या बावडीमध्ये मंडपाभोवती आकर्षक खांब देखील आहेत.

एका रात्रीच भाडं इतकं

आता इथे राहण्याच्या किमतीविषयी बोलणं केलं तर, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, येथे एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे १२,६०० पासून सुरू होते. तुम्ही प्रीमियम सुविधा घेतल्या तर याचं भाडं वाढत जाऊ शकत. राजवाडयच्या महागड्या खोल्या किंवा सुइट्स १ ते २ लाखांपर्यंत जातात. आता तुम्हाला वाटत असेल की इतके पैसे कशाचे… तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या खोल्यांमध्ये पॅलेस रूम्स, ग्रँड हेरिटेज रूम्स, सिग्नेचर सुइट्स, लक्झरी सुइट्स यांचा समावेश आहे.

सूर्यगडमध्ये लग्नाचा खर्च

सूर्यगड पॅलेस हे डेस्टिनेशन वेडिंगसाठी एक उत्तम ठिकाण मानले जाते. बॉलिवूड कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचाही विवाहसोहळा या पॅलेसमध्ये पार पडला. येथे दोन दिवसांच्या लग्नाचा खर्च सुमारे २ कोटी ते २.५ कोटी रुपये असू शकतो, ज्यामध्ये जवळजवळ सर्व सोई-सुविधांचा समावेश असतो.

Rainbow Mountain: जगभरात आहेत 5 रंगीबेरंगी पर्वत; फार आकर्षक आहेत इथली दृश्ये

सूर्यगढला कसं जायचं?

हवाई मार्ग
तुम्ही इथे विमानाने जायचा विचार करत असाल तर याच्या सर्वात जवळचे विमानतळ जैसलमेर विमानतळ आहे. तिथून सूर्यगड पॅलेसवर टॅक्सी किंवा हॉटेल कॅब सेवेने सुमारे २०-३० मिनिटांत पोहोचता येते.

रेल्वे मार्ग
जैसलमेर रेल्वे स्टेशन दिल्ली, जोधपूर, जयपूर आणि मुंबई सारख्या देशातील अनेक प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. स्टेशनपासून सूर्यगड पॅलेसपर्यंत टॅक्सी, ऑटो किंवा हॉटेल कॅब करू शकता. याने तुम्हाला सुमारे २०-२५ मिनिटे तिथे पोहचायला लागू शकतात.

रस्ता मार्ग
जैसलमेर शहरातही चांगली रस्ते कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही कार, खाजगी टॅक्सी किंवा राजस्थान रोडवेज बसने जैसलमेरला पोहोचू शकता. जैसलमेरहून सूर्यगड पॅलेसला जाण्यासाठी टॅक्सी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Web Title: Karan johars show the traitors was shot in this palace in jaisalmer lets understand the location and cost of the here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • karan johar
  • travel news
  • travel tips
  • Video Palace

संबंधित बातम्या

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
1

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी
2

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
3

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?
4

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.