(फोटो सौजन्य: Pinterest)
सध्या मान्सून ऋतू सुरु आहे. या ऋतूत अनेकांचे फिरायला जाण्याचे प्लॅन बनतात. अनेक ठिकाणचे सौंदर्य याकाळात आणखीनच बहरते. हा ऋतू फिरण्यासाठी एक उत्तम काळ मानला जातो. अशातच आज आम्ही तुम्हाला जगभरातील अशा काही पर्वतांची माहिती सांगत आहोत जे ज्यांचे रंगीबेरंगी सौंदर्य तुम्हाला मोहून टाकेल. हे रंगीत पर्वत अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. तुम्हीही जर फिरण्यासाठी एका सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल तर ही सुंदर पर्वते तुमच्यासाठी एक चांगला चांगला पर्याय आहे. इथे जाऊन तुम्ही तुमचा प्रवास संस्मरणीय बनवू शकता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येथील प्रत्येक दृश्यात तुम्हाला इंद्रधनुष्याची झलक दिसेल.
विनिकुंका, पेरू
जर तुम्हाला इंद्रधनुष्यासारखा पर्वत प्रत्यक्षात पाहायचा असेल, तर पेरूमधील विनिकुंका पर्वत हा सर्वोत्तम पर्याय आहे. या पर्वताला ‘सात रंगांचा पर्वत’ किंवा ‘मोंटाना डी सिएते कलर्स’ म्हणूनही ओळखले जाते. याची उंची लक्षात घेता, येथे ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी आदर्श वातावरण आहे. येथे तुम्हाला लाल, हिरवा, पिवळा आणि जांभळ्या रंगांचे भव्य दृश्य अनुभवता येईल.
झांग्ये डान्क्सिया, चीन
चीनमधील झांग्ये डान्क्सिया जिओलॉजिकल पार्कमधील रंगीबेरंगी खडकाळ पर्वतरांगा देखील इंद्रधनुष्य पर्वताची आठवण करून देतात. येथे लालसर, नारिंगी आणि हस्तिदंती छटा असलेल्या टेकड्या पाहायला मिळतात. हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफरसाठी एक परिपूर्ण जागा आहे.
रेनबो रेंज, कॅनडा
कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात, ट्वीड्समुइर प्रांतीय उद्यानाजवळ असलेली रेनबो रेंज देखील अत्यंत आकर्षक आहे. विविध रंगांनी नटलेली ही पर्वतरांग शांत आणि गर्दीपासून दूर असते, त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्यास इथे उत्तम संधी मिळते.
लँडमॅनलॉगर, आइसलँड
आइसलँडच्या उंच भागातील लँडमॅनलॉगर हे ठिकाण देखील रंगीबेरंगी पर्वतरांगांसाठी प्रसिद्ध आहे. इथले रायोलाइट पर्वत काळ्या लावाच्या शेतांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतात. या भागात भू-औष्णिक झरे आणि वाफाळणारे प्रदेश असल्याने येथे हायकिंग करताना अनोखा अनुभव मिळतो. रंगीबेरंगी पर्वतरांगांमध्ये ट्रेकिंगची मजा काही औरच असते.
10 देश जेथील खाण्याच्या नियमांविषयी ऐकून मन हेलावेल; शाकाहारी झाल्यास मिळते कठोर शिक्षा
पेंटेड हिल्स, अमेरिका
अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात असलेल्या पेंटेड हिल्स या टेकड्याही इंद्रधनुष्य पर्वतासारखेच मनोहारी दृश्य सादर करतात. इथल्या डोंगरांवर पिवळसर, हिरवट आणि गुलाबी रंगांचे थर दिसतात, जे सूर्यप्रकाशात अधिकच उठून दिसतात. हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षक आहे.