वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
सतत Acidity होतेय का?
ॲसिडिटीवर कोणते घरगुती उपाय करावे?
ॲसिडिटी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
तुम्हालाही वरचेवर ॲसिडिटीचा त्रास होतोय का? ॲसिडिटीमुळे ढेकर येणे आणि छातीत जळजळ होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. अधूनमधून असे होणे सामान्य मानले जाते, पण जर तुम्हाला ही समस्या सतत किंवा वारंवार जाणवत असेल, तर तुम्हाला तुमची पचनक्रिया सुधारण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे. तळलेले आणि मसालेदार पदार्थ तुम्ही जर जास्त करत असाल तर वेळीच टाळा. तुमच्या रोजच्या चहा आणि कॉफीचे सेवन कमी करा. तुम्ही काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता, जे खूप प्रभावी आहेत. जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी दररोज काय केले पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
ॲसिडिटीसाठी वारंवार औषधे घेणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्ही सर्वप्रथम तुमची पचनक्रिया सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी ॲसिडिटीपासून आराम मिळवण्याचे तीन उपाय सांगितले आहेत.
जेव्हा तुमच्या खाण्याच्या आणि दैनंदिन सवयी योग्य नसतात, तेव्हा तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. पोटातील ॲसिड वाढू लागते आणि ते अन्ननलिकेत परत येते. यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर, तोंडात वाईट चव आणि उलट्या झाल्यासारखे वाटणे यांसारखी लक्षणे दिसतात.
सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुम्ही सकाळची सुरुवात मनुकांनी करा. आम्लपित्ताचा त्रास कायम राहिल्यास, दिवसाची सुरुवात ८ भिजवलेल्या मनुका खाऊन करा. तुमच्या आहारात फायबर आणि नैसर्गिक पोषक तत्वे समाविष्ट करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
दुसरा उपाय म्हणजे जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय लावा. दुपारच्या जेवणानंतर भिजवलेली बडीशेप आणि रात्रीच्या जेवणानंतर १ चमचा बडीशेप खा. पारंपरिकरित्या पचनक्रियेस मदत करण्यासाठी बडीशेपचा वापर केला जातो आणि त्यामुळे पोट फुगणे देखील कमी होऊ शकते.
शीतली किंवा शीतकारी प्राणायाम करा असेही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. औषधांसोबतच, आम्लपित्त कमी करण्यासाठी तुम्ही प्राणायाम देखील केला पाहिजे. पोषणतज्ज्ञांनी शिफारस करतात की, तुम्हाला जे श्वासोच्छ्वास तंत्र (प्राणायाम) सर्वात सोयीस्कर वाटेल, मग ते शीतली असो किंवा शीतकारी, ते निवडावे आणि दुपारच्या जेवणापूर्वी १० वेळा व रात्रीच्या जेवणापूर्वी १० वेळा त्याचा सराव करावा.
आम्लपित्तावर नियंत्रण मिळवण्याच्या या पद्धती आराम मिळवण्यासाठी सातत्याने पाळल्या पाहिजेत, कारण कोणतेही औषध किंवा उपाय एका दिवसात काम करत नाही. दीर्घकालीन फायद्यांसाठी, समस्येवर सर्वसमावेशकपणे उपचार करणे आवश्यक आहे. तसेच, दररोज जेवणानंतर १० मिनिटे चालण्याची किंवा वज्रासन करण्याची सवय लावा. तुम्हालाही पित्ताचा त्रास होत असल्यास आम्ही सांगितलेले उपाय नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये अजूनही काही घरगुती उपाय माहीत असल्यास कळवा.






