Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या 'या' बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
लघवीला तीव्र वास कशामुळे येतो?
किडनीच्या आजारांची गंभीर लक्षणे?
युटीआय कशामुळे होते?
Kidney Health: शरीरातील विषारी घटक घाम, लघवी आणि शौचावाटे बाहेर पडून जातात. त्यामुळे लघवी जास्त वेळ थांबवून ठेवणे आवश्यक आहे. पण जीवनशैलीत होणारे बदल किडनीचे आरोग्य धोक्यात आणतात. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. बऱ्याचदा लघवीमध्ये दिसून येणारा फेस, तीव्र किंवा उग्र वास येणे किंवा लघवीचा रंग अधिक गडद इत्यादी अनेक बदल दिसून येतात. मात्र हे बदल सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. किडनीसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे दिसतात. पण कालांतराने समस्या आणखीनच तीव्र होतात आणि किडनी निकामी होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
कमी पाण्याच्या सेवनाव्यतिरिक्त अन्नपदार्थ, औषधे आणि विटामिनच्या गोळ्याचे सेवन केल्यामुळे लघवीच्या रंगात बदल दिसू लागतात. दिवसभरात आवश्यक प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यास लघवीचा रंग अतिशय फिकट किंवा पांढरा असतो, पण पाण्याचे सेवन कमी झाल्यानंतर लघवीच्या रंगात बदल दिसू लागतात. सतत फेसाळ लघवी, लालसर रंग, जळजळ, ताप, कंबरेत वेदना, सूज किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास वेळीच उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया लघवीच्या रंगात दिसणाऱ्या कोणत्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
लघवीला तीव्र वास किंवा उग्र वास संसर्गामुळे नाही येत तर शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे किंवा कॅल्शियम आणि इतर पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे सुद्धा येतो. ॲस्पॅरागस, कॉफी आणि अतिप्रमाणात मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे लघवीच्या रंगात बदल होण्यासोबतच लघवी करताना जळजळ आणि तीव्र वेदना सुद्धा होतात. जळजळ होणे, वारंवार लघवीला व्हावे लागणे, लघवी रोखता न येणे, पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना होणे इत्यादी लक्षणे किडनीसंबंधित आजार झाल्यानंतर दिसू लागतात.
जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे पूर्ण भरलेले मूत्राशय लघवी करताना टॉयलेटमधील पाण्यावर वेगाने आदळते, ज्याच्या परिणामामुळे फेस येतो. पण लघवीमध्ये कायमस्वरूपी फेस दिसत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. लघवीतून प्रोटीन बाहेर पडून जाण्यास सुरुवात झाल्यानंतर निरोगी किडनीमधील प्रोटीन लघवीवाटे बाहेर पडून जाते. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कुटुंबात किडनीच्या आजारांचा इतिहास इत्यादी आजार असलेल्यांना किडनीचे आजार लगेच होतात.
युटीआय किंवा लघवीसंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर लघवीतून रक्त जाण्यास सुरुवात होते. लघवीचा रंग गुलाबी दिसू लागतो. हे अतिशय गंभीर आणि शरीरासाठी धोक्याचे लक्षण आहे. किडनी, मूत्राशय किंवा मूत्रमार्गातील अधिक गंभीर आजारांशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी योग्य उपचार करणे आवश्यक आहे. शरीरात पाणी कमी असणे, संसर्ग, क्रिस्टल्स किंवा खड्यांमुळे लघवी मार्गात संसर्ग वाढतो.






