Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

Avoid These foods For Children's In Monsoon: पावसाळ्यात बदलते हवामान, वाढलेली आर्द्रता आणि जिवाणू-व्हायरसचा प्रादुर्भाव यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे त्यांच्या आहारात योग्य बदल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 27, 2026 | 06:05 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी
  • चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ
  • अन्यथा आरोग्य बिघडू शकते
पावसाळा उकाड्यापासून दिलासा देणारा असला तरी हा ऋतू लहान मुलांसाठी अनेक संसर्गजन्य आजार घेऊन येतो. हवेत वाढलेली आर्द्रता, दूषित अन्न-पाणी आणि सक्रिय होणारे जिवाणू व विषाणू यामुळे मुलांना सर्दी, ताप, घशाचा संसर्ग तसेच पोटाचे विकार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आहाराबरोबरच स्वच्छता आणि दैनंदिन सवयींकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात काही पदार्थ मुलांना देणे टाळल्यास संसर्गाचा धोका कमी करता येतो. हे पदार्थ कोणते, जाणून घ्या.

Makeup Causes Cancer: मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका ? ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

बाहेरचे आणि स्ट्रीट फूड टाळा

पाणीपुरी, चाट, समोसे, भजी किंवा इतर रस्त्यावरील पदार्थ पावसाळ्यात दूषित होण्याची शक्यता अधिक असते. अशा अन्नामुळे पोटाचे संसर्ग आणि फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मुलांना शक्यतो ताजे, स्वच्छ आणि घरचेच अन्न द्यावे.

कापलेली फळे आणि शिळे अन्न देऊ नका

उघड्यावर ठेवलेली कापलेली फळे किंवा शिळे अन्न यामध्ये जिवाणू व बुरशी वेगाने वाढू शकते. त्यामुळे मुलांना नेहमी ताजी फळे आणि ताजे शिजवलेले अन्नच द्यावे.

थंड पेये आणि सॉफ्ट ड्रिंक्सपासून दूर ठेवा

कोल्ड ड्रिंक्स किंवा अतिथंड पेये घशाचा संसर्ग, सर्दी आणि पचनाच्या तक्रारी वाढवू शकतात. त्याऐवजी साधे उकळून थंड केलेले पाणी, नारळपाणी किंवा घरगुती सूप देणे अधिक फायदेशीर ठरते.

तळलेले आणि मसालेदार पदार्थ कमी द्या

या काळात मुलांची पचनशक्ती तुलनेने कमी असू शकते. जास्त तेलकट, तळलेले किंवा मसालेदार पदार्थांमुळे अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हलका आणि संतुलित आहार अधिक योग्य मानला जातो.

पालेभाज्या स्वच्छ धुवूनच वापरा

पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये माती व जंतू असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्या अनेक वेळा स्वच्छ पाण्याने धुवून आणि व्यवस्थित शिजवूनच मुलांना द्याव्यात.

पालकांसाठी महत्त्वाची गोष्ट

मुलांना पौष्टिक, ताजे आणि घरगुती अन्न द्या. पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा, हात धुण्याची स्वच्छता पाळा आणि कोणतीही गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पावसाळ्यात थोडीशी काळजी घेतल्यास मुलांना अनेक हंगामी संसर्गांपासून सुरक्षित ठेवता येऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Curd Benefits: दह्यासोबत साखर की मीठ काय खावे? आरोग्यासाठी नेमकं काय अधिक फायदेशीर? जाणून घ्या

Web Title: Kids health in monsoon diet tips street food avoid children immunity rainy season marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Child Health
  • Health Care Tips
  • Monsoon
  • parenting tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.