सुरीची धार काढण्यासाठी 'या' सोप्या टिप्स वापरा
प्रत्येक स्वयंपाक घरात भाजी कापण्यासाठी किंवा फळे कापण्यासाठी सुरीचा वापर केला जातो. घरामध्ये कोणताही पदार्थ बनवताना चाकू किंवा सुरीची आवश्यकता ही लागतेच. मिक्सर, भांडी, कुकर इत्यादी वस्तूंप्रमाणे घरामध्ये सुरीचा देखील वापर केला जातो. सूरी नसेल तर आपली सर्व काम अर्धवट राहतील. त्यामुळे प्रत्येक घरात सूरी ही असतेच. सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूरी, चाकू, कैची उपलब्ध झाल्या आहेत. ज्यांचा वापर दैनंदिन वापरामध्ये केला जातो. पण अनेकदा कितीही महागातील सूरी किंवा चाकू आणला तरी त्याला जास्तदिवस धार राहत नाही. लगेच धार निघून जाते. सुरीची धार गेल्यानंतर आपण लगेच तिची धार काढतो किंवा फेकून देतो.सुरीची धार गेल्यानंतर भाजी, फळे किंवा इतर कोणतेही साहित्य कापताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी काही सोप्या टिप्स वापरून सुरीची धार कशी काढ्याची, याबद्दल काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्ही घरी नक्की वापरून पहा. (फोटो सौजन्य- istock)
सर्वच घरांमध्ये काचेचा कप उपलब्ध असतो. काचेच्या कपात चहा किंवा कॉफी प्यायली जाते. पण याच कपाचा वापर करून सुरीला धार काढू शकता. काचेचा कप उलटा करून टेबलावर ठेवा. त्यानंतर कपावर सूरी दोन्ही बाजूने घसा. यामुळे सुरीला व्यवस्थित धार निघेल.
पाटा वरवंटाचा वापर करून तुम्ही सुरीला धार काढू शकता. यासाठी पाटा वरवंटा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर सुरीच्या दोन्ही बाजू व्यवस्थित त्यावर घासा. यामुळे सुरीला धार निघेल. सुरीला धार काढत असताना ती काळजीपूर्वक काढावी. जेणेकरून तुमच्या हाताला कोणतीही इजा होणार नाही.
न्यूज पेपरच्या सहाय्याने सुरीला धार काढता येते. यासाठी न्यूज पेपरच्या घड्या तयार करून घ्या. त्यावर सूरी घासा. सूरी घासल्यामुळे घर्षण होऊन सुरीला धार निघेल.