राजनाथ सिंह आणि सीएम देवेंद्र फडणवीस असलेल्या सिम्बायोसिस कॉलेज कार्यक्रमस्थळी साप आढळला (फोटो - प्रातिनिधिक)
Snakes in symbiosis: पुणे : सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा सहावा दीक्षांत समारंभ सोहळा होणार आहे. स्कुल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचा शुभारंभ देखील केला जाणार आहे. किवळे येथे सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र घटनास्थळी साप आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमस्थळी मंचाजवळ साप आढळल्यामुळे गोंधळ उडाला आहे.
सिम्बायोसिस कॉलेजमधील पदवी प्रदान सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते एकाच प्रमुख मंचावर बसणार होते. मात्र मंचावर साप रांगताना दिसून आला. या सापाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. मंचाच्या आसपासच्या परिसरामध्ये साप दिसून आला. प आढळल्यामुळे उपस्थित यंत्रणांची धावपळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, हा साप मंचाच्या खाली गेला आहे. मंत्री महोदय मंचावर येण्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सापाला बाजूला करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. तसेच या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमापूर्वी साप पकडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
बातमी अपडेट होत आहे