इमारतीवरून उडी मारत ज्येष्ठाची आत्महत्त्या (File Photo : Suicide)
पुणे : गेल्या 28 वर्षांपासून न्यायालयात खेटे घालूनही न्याय मिळत नसल्याच्या नैराश्येतून एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. नामदेव यशवंत जाधव (वय ६१, रा. वडकी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. नामदेव जाधव यांनी बुधवारी (दि.१५) सकाळी शिवाजीनगर न्यायालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.
नामदेव जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे. या आत्महत्येनंतर सर्वच स्तरावर चर्चा सुरु आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी (दि.15) सकाळी नामदेव जाधव हे शिवाजीनगर येथील न्यायालयात आले. न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन त्यांनी उडी मारली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.
हेदेखील वाचा : Parbhani Crime: नातेवाइकांचा विरोध आणि प्रेमभंगातून तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या, व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला भावनिक संदेश
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जाधव यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.
1997 पासून सुरू होता जागेचा खटला
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव हे वडकी येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी जमीन विक्री केली होती. पण, ही विक्री नामदेव यांच्या परस्पर व त्यांना विचारून केली नाही, असा त्यांचा दावा होता.
परभणीत तरुणाची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथे एका तरुणाने प्रेमसंबंधातील नैराश्यामुळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. मृत तरुणाचे नाव माणिक कारभारी खोसे (वय २५) आहे. आत्महत्येपूर्वी माणिकने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावनिक संदेश ठेवला आणि तो नातेवाइकांनाही पाठवला. संदेशातून त्याचा मानसिक तणाव आणि प्रेमभंगातील अस्वस्थता स्पष्टपणे दिसत आहे.
हेदेखील वाचा : Nashik Crime : नाशिक हादरलं ! भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला;दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार