साडी नेसणाऱ्या महिलांनी व्हा सावध, तुमची एक चूक बनू शकते कॅन्सरचे कारण
भारतातील प्रत्येक महिलेला साडी नेसायला प्रचंड आवडते. त्यातही जर एखाद्या कार्यक्रमास जायचे असेल तर मग अगदी नटूनच त्या बाहेर पडतात. एवढेच काय हल्ली कॉलेजमध्ये सुद्धा साडी दे नावाचा दिवस साजरा केला जातो, जिथे कॉलेजमधील सर्वच मुली साड्या नेसून येत असतात. एरवी सध्या रूपात वावरणारी स्त्री जेवहा साडी नेसून वावरू लागते तेव्हा तिच्यातले सौंदर्य अधिकच खुलते.
मार्केटमध्ये सुद्धा आता अशा फॅशनेबल साड्या आल्या आहेत, ज्यांना पाहून अनेक स्त्रिया त्या लगेच विकत घेत असतात. परंतु आता साडी नेसणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एका नवीन संशोधनात धक्कादायक तथ्य समोर आले आहे जे महिलांना साडी नेसण्याच्या पद्धतीबद्दल विचार करण्यास भाग पाडतील.
हे देखील वाचा: फक्त पिकलेली नाही तर कच्ची केळी खाण्याचे सुद्धा आहे अजब फायदे, एकदा पहाच
बिहार आणि महाराष्ट्रातील डॉक्टरांनी एक चेतावणी जारी केली आहे. यात त्यांनी सांगितले आहे की साडीने पेटीकोट जास्त घट्ट परिधान केल्यास त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
महाराष्ट्रातील वर्धा येथे जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि बिहारमधील मधुबनी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टरांनी कॅन्सरने ग्रस्त दोन महिलांवर उपचार केल्यानंतर इशारा दिला की, भारताच्या ग्रामीण भागात पारंपारिकपणे साडीखाली परिधान केलेला अंडरस्कर्ट म्हणजेच घट्ट बांधलेल्या पेटीकोटमुळे त्वचा सतत घर्षण होते यामुळे त्वचेवर सूज येऊ शकते. अनेक वेळा यामुळे फोड सुद्धा येऊ शकतात आणि काही प्रकरणांमध्ये त्वचेचा कॅन्सरही होऊ शकतो.
याला पूर्वी ‘साडीचा कर्करोग’ म्हणून ओळखले जात होते, परंतु डॉक्टरांनी बीएमजे केस रिपोर्ट्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की कंबरेच्या दोरीतील घट्टपणा यासाठी कारणीभूत आहे आणि म्हणूनच त्याला ‘पेटीकोट कॅन्सर’ असे नाव देण्यात आले आहे.
हे देखील वाचा:सुखी संसारानंतरही नवरा का देतो बायकोला धोका? 4 कारण वाचून तुमच्या डोक्याचा होईल भुगा
पहिल्या प्रकरणात, एका 70 वर्षीय महिलेने वैद्यकीय मदत मागितली होती कारण तिच्या उजव्या बाजूला 18 महिन्यांपासून त्वचेचा अल्सर होता जो बरा होत नव्हता. तिच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंगही गेला होता. ही महिला सुरुवातीपासून साडी नेसायची. डॉक्टरांनी महिलेची बायोप्सी केली, त्यानंतर असे दिसून आले की महिलेला मार्जोलिन अल्सर आहे, ज्याला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (अल्सरेटेड स्किन कॅन्सर) असेही म्हणतात.
घट्ट कपड्यांमुळे त्वचेवर सततचा दबाव पडतो, त्यामुळे हा अल्सर अनेकदा पूर्णपणे बरा होत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे जुनी जखम तयार होते, जी भविष्यात धोकादायक बनू शकते. म्हणूनच त्वचेवरील दाब कमी करण्यासाठी साडीखाली सैल पेटीकोट घालण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देतात.






