
Walking Benefits: वयानुसार दररोज किती चालावे? जाणून घ्या योग्य अंतर आणि फायदे
कोणतेही विशेष डाएट किंवा व्यायाम न करता अचानक वजन कमी होणे हे लिव्हर कॅन्सरचे सुरुवातीचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. यासोबतच भूक कमी लागणे किंवा थोडे खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटणे ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नयेत.
पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर ते लिव्हरच्या कार्यक्षमतेत बिघाडाचे संकेत असू शकतात. शरीरातील विषारी पदार्थ योग्य प्रकारे बाहेर न पडल्याने ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटते.
लिव्हर शरीराच्या उजव्या बाजूला असते. त्यामुळे त्या भागात सतत वेदना, जडपणा किंवा सूज जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. काही रुग्णांमध्ये ही वेदना खांद्यापर्यंतही जाणवू शकते.
त्वचा किंवा डोळे पिवळे पडणे म्हणजेच कावीळ हे लिव्हरच्या गंभीर समस्यांचे महत्त्वाचे लक्षण आहे. लिव्हर योग्य पद्धतीने काम करत नसल्यास शरीरात बिलीरुबिन वाढते आणि त्यामुळे हा बदल दिसून येतो.
लिव्हर कॅन्सरमध्ये पोटात सूज येणे, पाणी साचणे, सतत मळमळ होणे किंवा उलट्या होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. अनेकजण या समस्येकडे अपचन समजून दुर्लक्ष करतात. यामुळे कॅन्सर असल्याचे निदान होत नाही.
तज्ज्ञांच्या मते, लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे कठीण असले तरी वेळेत तपासणी केल्यास कॅन्सरचा धोका कमी करता येऊ शकतो. विशेषतः फॅटी लिव्हर, हेपेटायटिस बी- मद्यपान किंवा लिव्हरशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Health Tips: सावधान! सतत घाम येतोय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचा असू शकतो धोका