(फोटो सौजन्य-AI एआय)
लुसिड ड्रीममध्ये आपण पूर्णपणे जागे झालेलो नसतो. शरीर झोपेच्या अवस्थेत असत आणि स्वप्न सुरू असत; पण मेंदूतील काही भाग सामान्य स्वप्नांच्या तुलनेत जास्त सक्रिय होऊ शकतात. विशेषतः REM म्हणजे Rapid Eye Movement झोपेच्या टप्प्यात लुसिड ड्रीम होण्याची शक्यता जास्त असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. या टप्प्यात स्वप्ने अधिक जिवंत आणि स्पष्ट असण्याची शक्यता असते.
लुसिड ड्रीमचा अनुभव प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. काही जणांना स्वप्नात उडणे, एखाद्या ठिकाणी जाणे किंवा परिस्थिती बदलणे- कंट्रोल करता येणे शक्य झाल्याचे जाणवते. पण स्वप्नावर पूर्ण नियंत्रण मिळेलच असे नाही. अनेक वेळा स्वप्नातील घटना आपल्या अपेक्षेप्रमाणे बदलत नाहीत आणि अचानक जागही येऊ शकते.
अशी स्वप्ने येण्यासाठी काही लोक ‘Reality Check’ सारख्या पद्धती वापरतात. दिवसभर एखादी गोष्ट खरोखर घडतेय की स्वप्न आहे, हे स्वतःला तपासण्याची सवय लावली जाते. स्वप्नांची डायरी लिहिणे, झोपेचे नियमित वेळापत्रक ठेवणे आणि झोपण्यापूर्वी स्वप्नांची जाणीव ठेवण्याचा प्रयत्न करणे अशा वेगेवगळ्या तरकीब काही लोक वापरतात.
पण लुसिड ड्रीम म्हणजे झोपेवर जादुई नियंत्रण मिळवण्याचा प्रकार मुळीच नाही, एखादी चांगली गाढ झोपच तुम्हाला लुसिड ड्रीमचा अनुभव घडवून आणू शकते. वारंवार झोप मोडणे किंवा अपुरी झोप घेऊन लुसिड ड्रीम करण्याचा प्रयत्न केल्यास उलट थकवा आणि झोपेचा त्रास होऊ शकतो.
विशेष म्हणजे, लुसिड ड्रीमचा वापर काही संशोधक स्वप्न, स्मरणशक्ती आणि झोपेच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठीही करतात. त्यामुळे ‘स्वप्नात असूनही आपण स्वप्न पाहत आहोत हे कळणे’ ही कल्पना केवळ मनोरंजक नाही, तर मानवी मेंदू आणि झोप समजून घेण्यासाठीही महत्त्वाची ठरते.






