डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर ( सौजन्य - सोशल मीडिया )
ब्रँड्स जाहिरातींची निर्मिती आणि सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा AI वापर करत आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे कंटेंटचा ग्राहकांवर होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करतात. अवास्तव अपेक्षा निर्माण करणे, दुर्बल घटकांचा गैरफायदा घेणे, असुरक्षित परिस्थिती दाखवणे, संमतीशिवाय एखाद्या व्यक्तीच्या रूपाचा वापर करणे किंवा खोटी व दिशाभूल करणारी माहिती देणे यांमुळे एसजीसी दिशाभूल करणारे किंवा हानीकारक ठरू शकते. SGC चा वापर करणाऱ्या सर्व जाहिरातींना एएससीआय कोडचे पालन करणे बंधनकारक आहे.
ही मार्गदर्शकतत्त्वे प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर लागू होतील. जाहिरातदारांना माहिती उघड करणे कधी आवश्यक आहे आणि एसजीसीचे कोणते वापर अमान्य आहेत हे समजण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वांमध्ये चार प्रमुख विभाग स्पष्ट करण्यात आले आहेत:
बेकायदेशीर असलेल्या, हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या, दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या किंवा एएससीआय कोडचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरातींवर एआय लेबल वापरले असले तरीही बंदी कायम राहील. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
● बनावट शिफारशी किंवा प्रशंसापत्रे तयार करणे.
● सिंथेटिक सादरीकरणाद्वारे उत्पादनाचे निकाल किंवा वैशिष्ट्ये दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने सांगणे.
● ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी अस्तित्वात नसलेली ठिकाणे किंवा पार्श्वभूमी खरी म्हणून दाखवणे.
● अनधिकृत कॉपीराइट सामग्रीचा वापर करणे.
● संमतीशिवाय डीपफेक किंवा एखाद्या व्यक्तीच्या फोटोचा वापर करणे.
SGC ग्राहकांच्या निर्णयांवर प्रभाव पाडते आणि खुलासा न केल्यास ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, तिथे लेबल लावणे अनिवार्य आहे. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
● कृत्रिमरित्या तयार केलेल्या इन्फ्लुएन्सर्स आणि ब्रँड अॅम्बेसेडर्सचा वापर.
● वैयक्तिकृत संदेशासाठी संमतीने एखाद्या खऱ्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाजाची नक्कल करणे.
● जाहिरात केलेल्या उत्पादन किंवा सेवेविषयी ग्राहकांवर प्रभाव टाकू शकतील अशा बनावट घटना किंवा पार्श्वभूमी दाखवणे.
● सध्या अस्तित्वात नसलेल्या उत्पादनांचे प्रात्यक्षिक दाखवणे.
● एसजीसी-निर्मित साऊंड इफेक्टस, जे हेडफोन्ससारख्या उत्पादनाच्या मुख्य वैशिष्ट्यांशी अत्यंत संबंधित असतात.
● देय भरलेल्या किंवा प्रायोजित एआय-निर्मित उत्पादन सूचना, ज्यावर स्पष्टपणे “स्पॉन्सर्ड बाय (ब्रँड)” असे लेबल असणे आवश्यक आहे
SGCचा माहितीपूर्ण निर्णय घेण्याच्या ग्राहकाच्या क्षमतेवर कोणताही प्रभाव पडत नाही, तिथे खुलासा करण्याची आवश्यकता नाही. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
● नियमित एडिटिंग, जसे कलर करेक्शन, लाइट अॅडजस्टमेंट, आवाज कमी करणे आणि किरकोळ डाग काढणे.
● सजावटीचे किंवा सभोवतालचे पार्श्वभूमी घटक.
● स्पष्टपणे काल्पनिक असणारे इफेक्ट्स.
● प्रशासकीय आणि मजकूर-आधारित वापर, जसे जाहिरातीचा मसुदा तयार करणे.
● सुलभता वाढवणारे अॅप्लिकेशन्स, जसे उपशीर्षके, भाषांतर आणि अचूक ऑडिओ वर्णन.
माहिती उघड करणे आवश्यक आहे, तिथे ब्रँड्स “एआय वापरून ऑडिओ/व्हिडिओ तयार केला आहे” किंवा “एआय वापरून ऑडिओ/व्हिडिओमध्ये बदल केला आहे” यांसारखी जाहिरात प्लॅटफॉर्मने दिलेली लेबल्स वापरू शकतात. ब्रँड्स ग्राहकांना सिंथेटिक कंटेंटचे स्वरूप अचूकपणे समजेल अशी पर्यायी लेबल्स वापरू शकतात. हे खुलासे लागू असलेल्या ठिकाणी अस्वीकृतीवरील एएससीआय कोडच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असणे आवश्यक आहे.
ASCI च्या सेक्रेटरी जनरल आणि सीईओ मनिषा कपूर म्हणाल्या, “जाहिरातींमध्ये एआयचा वापर वेगाने वाढत आहे आणि ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून आमचा दृष्टिकोनही त्यानुसार बदलणे गरजेचे आहे. विशेषतः एआय लेबलशिवाय जाहिरातीबद्दल ग्राहकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे ही मार्गदर्शकतत्त्वे व्यावहारिक पारदर्शकतेची खात्री देतात. महत्त्वाचे म्हणजे, या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ एआय लेबल लावल्याने कोणतीही दिशाभूल करणारी जाहिरात स्वीकारार्ह ठरत नाही. संवाद प्रामाणिक, पारदर्शक आणि एएससीआय कोडशी सुसंगत असेल याची खात्री करण्याची जबाबदारी जाहिरातदारांची राहील.”






