(फोटो सौजन्य – Pinterest)
फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?
कार्यक्रम आणि त्यांची वैशिष्ट्ये
तिकिट घेतल्यावर तुम्हाला तीन महत्त्वाचे आणि भव्य कार्यक्रम पाहण्याची संधी मिळेल:
प्रजासत्ताक दिन परेड (26 जानेवारी 2026)
हा मुख्य आकर्षणाचा कार्यक्रम असतो. यात विविध राज्यांच्या आणि मंत्रालयांच्या झांक्या, भारतीय वायुसेनेचा भव्य फ्लायपास्ट आणि शौर्य आणि सेवेसाठी जवानांचा सन्मान केला जातो.
बीटिंग रिट्रीट – फुल ड्रेस रिहर्सल (28 जानेवारी 2026)
या दिवशी प्रत्यक्ष समारंभाची झलक पाहायला मिळते. लष्करी बँडच्या शिस्तबद्ध धून आणि वातावरणातील देशभक्ती अनुभवता येते.
बीटिंग रिट्रीट समारंभ (29 जानेवारी 2026)
या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिनाचे औपचारिक समारोप होते. मनाला स्पर्श करणाऱ्या धून आणि प्रकाशयोजनांसह हा सोहळा देशभक्तीची भावना जागवतो.
तिकिटांचे दर
ऑनलाइन बुकिंग:
घरबसल्या तुम्ही अधिकृत आमंत्रण पोर्टल www.aamantran.mod.gov.in वर जाऊन तिकिट बुक करू शकता. या सुविधेमुळे देशातील कोणत्याही भागातून सहजपणे तिकिट मिळू शकते आणि रांगेत उभे राहण्याची गरज राहत नाही.
ऑफलाइन तिकिट काउंटर:
जर तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन तिकिट घ्यायचे असेल, तर 5 ते 14 जानेवारीदरम्यान दिल्लीतील ठराविक काउंटरवर तिकिटे उपलब्ध असतील. वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 5 असा असेल. तिकिट घेताना मूळ फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इ.) दाखवणे आवश्यक आहे. हेच ओळखपत्र कार्यक्रमाच्या दिवशीही सोबत ठेवावे लागेल.
दिल्लीतील ऑफलाइन तिकिट काउंटर
अधिकृत अपडेट्स तपासत राहा
प्रजासत्ताक दिनाशी संबंधित सर्व कार्यक्रमांची आणि ताज्या माहितीसाठी rashtraparv.mod.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. हा राष्ट्रीय सोहळा देशाची एकता, शिस्त आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे तिकिटे वेळेत बुक करून या ऐतिहासिक अनुभवाचा भाग व्हा.






