Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक

FDA News: महाराष्ट्र FDA ने एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान औषध उत्पादन व विक्री आस्थापनांच्या ४,७२३ तपासण्या केल्या. ३५४ परवाने रद्द, १,२२७ निलंबित, तर २०.२३ कोटींचा औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 14, 2026 | 06:26 PM
FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक

FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक

Follow Us
Follow Us:
  • तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची धडक कारवाई!
  • औषध विक्रेते आणि उत्पादकांच्या तपासण्या ४.६ पटींनी वाढल्या
  • २० कोटींचा औषधसाठा जप्त
FDA News: महाराष्ट्रात बनावट, निकृष्ट दर्जाची आणि विनापरवाना औषधे विकणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. राज्यातील औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांच्या तपासण्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, एप्रिल-मे २०२६ च्या तुलनेत जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत मासिक सरासरी तपासण्यांचे प्रमाण तब्बल ४.६ पटींनी वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांत राज्यभरात ४,७२३ तपासण्या करण्यात आल्या असून, ३५४ परवाने रद्द आणि १,२२७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच सुमारे २०.२३ कोटी रुपये किमतीचा औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली औषधांची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया, साठवणूक आणि विक्रीतील नियमांचे पालन यांची अधिक काटेकोरपणे पडताळणी करण्यात येत आहे.

नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द

औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांच्या तपासण्यांत ४.६ पट वाढ

एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांत राज्यातील औषध उत्पादन आस्थापनांच्या १२० आणि विक्री आस्थापनांच्या ३४७ अशा एकूण ४६७ तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्या वेळी दरमहा सरासरी सुमारे २३४ तपासण्या होत होत्या. मात्र, जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत उत्पादन आस्थापनांच्या ९६५ आणि विक्री आस्थापनांच्या ३,२९१ अशा एकूण ४,२५६ तपासण्या करण्यात आल्या. या कालावधीत मासिक सरासरी तपासण्यांची संख्या १,०६४ वर पोहोचली. म्हणजेच अवघ्या काही महिन्यांत तपासण्यांचा वेग सुमारे ४.६ पटींनी वाढला. उत्पादन आस्थापनांच्या मासिक तपासण्या सुमारे चारपट, तर औषध विक्री आस्थापनांच्या तपासण्या सुमारे ४.७ पटींनी वाढल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

सहा महिन्यांत ४,७२३ तपासण्या

एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत FDA ने राज्यभरात एकूण ४,७२३ तपासण्या केल्या. यामध्ये औषध उत्पादन करणाऱ्या आस्थापनांच्या १,०८५ आणि औषध विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या ३,६३८ तपासण्यांचा समावेश आहे. या तपासण्यांदरम्यान औषधांची गुणवत्ता, परवाना अटींचे पालन, औषधांचा साठा, विक्रीची वैधता आणि इतर नियमांची अंमलबजावणी यांची पडताळणी करण्यात आली.

३५४ परवाने रद्द, १,२२७ निलंबित

नियमांचे उल्लंघन आढळलेल्या औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांविरोधात प्रशासनाने नियामक कारवाई केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत एकूण १,६८१ नोटिसा बजावण्यात आल्या. त्यामध्ये उत्पादन आस्थापनांना २७३ आणि विक्री आस्थापनांना १,४०८ नोटिसा देण्यात आल्या. याशिवाय ३५४ परवाने रद्द करण्यात आले. त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील ८६ आणि विक्री क्षेत्रातील २६८ परवान्यांचा समावेश आहे. तसेच १,२२७ परवाने निलंबित करण्यात आले. त्यापैकी १३३ उत्पादन आस्थापनांचे, तर १,०९४ विक्री आस्थापनांचे परवाने आहेत. अशा प्रकारे सहा महिन्यांत परवाने रद्द आणि निलंबित करण्याच्या एकूण १,५८१ नियामक कारवाया करण्यात आल्या आहेत.

तपासणी उद्दिष्टपूर्ती २९ टक्क्यांवरून १३१ टक्क्यांवर

अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेत केवळ तपासण्यांची संख्याच वाढलेली नाही, तर निश्चित उद्दिष्टपूर्तीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात सुधारले आहे. एप्रिल-मे २०२६ मध्ये तपासणी उद्दिष्टपूर्तीचे प्रमाण सुमारे २९ टक्के होते. जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत हे प्रमाण १३१ टक्क्यांवर पोहोचले. उत्पादन आस्थापनांच्या तपासणी उद्दिष्टपूर्तीचे प्रमाण २६ टक्क्यांवरून १०६ टक्क्यांपर्यंत वाढले. तर विक्री आस्थापनांच्या तपासणी उद्दिष्टपूर्तीचे प्रमाण ३१ टक्क्यांवरून १४१ टक्क्यांवर पोहोचले.

२०.२३ कोटींचा औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित

अन्न व औषध प्रशासनाच्या शोध आणि जप्तीच्या कारवायांमध्येही मोठी वाढ झाली आहे. एप्रिल-मे २०२६ या दोन महिन्यांत आठ शोध व जप्ती कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सुमारे १.१२ कोटी रुपये किमतीचा औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला होता. मात्र, जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत तब्बल ११५ शोध व जप्ती कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये सुमारे १९.११ कोटी रुपये किमतीचा औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला. अशा प्रकारे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत एकूण १२३ शोध व जप्ती कारवायांमध्ये सुमारे २०.२३ कोटी रुपयांच्या औषधसाठ्यावर कारवाई करण्यात आली.

३५ गुन्हे दाखल, १५ जणांना अटक

FDA च्या अंमलबजावणी मोहिमेदरम्यान विविध प्रकारच्या नियमभंगाच्या प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एप्रिल-मे २०२६ मध्ये दोन गुन्हे दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. तर जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आणि १४ जणांना अटक करण्यात आली. म्हणजेच सहा महिन्यांत एकूण ३५ गुन्हे दाखल झाले असून, १५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

कोणत्या प्रकारच्या प्रकरणांत FDA ची कारवाई?

जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत FDA ने विविध प्रकारच्या औषधविषयक उल्लंघनांविरोधात कारवाई केली. यामध्ये विनापरवाना औषधसाठा आणि विक्रीच्या ४३ कारवायांचा समावेश आहे. औषधे व जादूटोणा उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम, १९५४ अंतर्गत आक्षेपार्ह जाहिरातींविरोधात ३१ कारवाया करण्यात आल्या. बनावट औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित १४, चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या नामांकनाच्या सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित १० आणि गुंगीकारक औषधांच्या गैरवापराविरोधात NDPS कायद्यांतर्गत नऊ कारवाया करण्यात आल्या. याशिवाय वैद्यकीय उपकरणांशी संबंधित तीन, फसव्या साधर्म्याच्या ब्रँड नावांबाबत तीन आणि लेबलविषयक उल्लंघनांबाबत दोन कारवाया करण्यात आल्या.

‘बनावट आणि निकृष्ट औषधांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार’ – तुकाराम मुंढे

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. “नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे ही अन्न व औषध प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. गेल्या चार महिन्यांत तपासण्यांची संख्या तसेच अंमलबजावणी कारवायांमध्ये झालेली लक्षणीय वाढ ही प्रशासनाच्या सजगतेचे द्योतक आहे. बनावट, निकृष्ट व विनापरवाना औषधांचा बाजारात शिरकाव होऊ नये यासाठी राज्यभर तपासणी मोहीम अधिक व्यापक करण्यात येईल आणि दोषींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,” असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी FDA सज्ज

राज्यातील औषध उत्पादन आणि विक्री व्यवस्थेत नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक व्यापक केली आहे. औषधांची गुणवत्ता, वैध परवाने, योग्य साठवणूक आणि विक्रीतील पारदर्शकता यांची पडताळणी करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

गेल्या सहा महिन्यांत झालेल्या तपासण्या, परवाना कारवाया आणि जप्तीच्या आकडेवारीतून औषध क्षेत्रातील नियामक देखरेख वाढल्याचे दिसून येते. आगामी काळातही बनावट, निकृष्ट आणि विनापरवाना औषधांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र FDA ने सहा महिन्यांत किती औषध आस्थापनांच्या तपासण्या केल्या?

    Ans: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत एकूण ४,७२३ तपासण्या केल्या. यामध्ये औषध उत्पादन आस्थापनांच्या १,०८५ आणि औषध विक्री आस्थापनांच्या ३,६३८ तपासण्यांचा समावेश आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान मासिक सरासरी तपासण्यांमध्ये सुमारे ४.६ पट वाढ झाली

  • Que: FDA ने किती औषध विक्रेते आणि उत्पादकांचे परवाने रद्द किंवा निलंबित केले?

    Ans: एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान FDA ने एकूण १,५८१ परवान्यांवर कारवाई केली. त्यामध्ये ३५४ परवाने रद्द करण्यात आले, तर १,२२७ परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांना १,६८१ नोटिसा बजावण्यात आल्या.

  • Que: FDA च्या कारवाईत किती कोटींचा औषधसाठा जप्त झाला आणि किती जणांना अटक करण्यात आली?

    Ans: महाराष्ट्र FDA ने सहा महिन्यांत १२३ शोध व जप्ती कारवाया केल्या. या कारवायांमध्ये सुमारे २०.२३ कोटी रुपये किमतीचा औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला. विविध प्रकरणांत ३५ एफआयआर दाखल करण्यात आले असून, १५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra fda drug inspections rise 4 6 times tukaram mundhe 20 crore medicines seized sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • FDA
  • maharashtra
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार
1

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
2

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
3

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
4

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.