Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

रात्रीच्या जेवणातील शिल्लक राहिलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी चपात्यांपासून विविध पदार्थ बनवून खावेत. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. जाणून घेऊया चपाती रोल्स बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2026 | 08:00 AM
रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी संध्याकाळच्या जेवणापर्यंत लहान मुलांना कायमच चविष्ट आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी मुलांना एकतर विकतचे पदार्थ आणून खाण्यास दिले जातात किंवा घरी कायमच बनवले जाणारे पदार्थ खाण्यास दिले जाते. तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा झाल्यास झटपट तुम्ही चपाती रोल्स बनवू शकता. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. रात्रीच्या जेवणात चपाती शिल्लक राहिल्यानंतर त्यापासून नेमकं काय करावं सुचत नाही. शिल्लक राहिलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी या पद्धतीने चपातीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खावेत. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. सकाळच्या वेळी खूप जास्त घाई असते. घाईमध्ये काय बनवावं सुचत नाही. चला तर जाणून घेऊया चपाती रोल्स बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – AI)

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • शिल्लक राहिलेल्या चपात्या
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • बटाटे
  • हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • चाट मसाला
  • चीज
  • बटर
  • कोथिंबीर
Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

कृती:

  • चपाती रोल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात शिमला मिरची, मक्याचे दाणे आणि तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या घालून वाफेवर शिजवून घ्या.
  • भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, चाट मसाला आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही पनीर सुद्धा घालू शकता यामुळे पदार्थाची चव आणखीनच सुंदर लागेल.
  • तयार केलेले भाज्यांचे मिश्रण चपातीमध्ये एकसमान पसरवून घ्या आणि वरून किसून घेतलेले चीज टाकून चपातीचा रोल करा.
  • रोल काढून घेतलेली चपाती बटरमध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि शेजवान चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चपाती रोल. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम आहे.

Web Title: Make a fantastic and delicious breakfast using leftover chapatis from the night before a perfect dish for kids lunchboxes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
1

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
2

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
3

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
4

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.