
तेलाचा अजिबात वापर न करता नाश्त्यात बनवा कुरकुरीत स्वादिष्ट पिझ्झा सामोसा, लहान मुलांसह मोठ्यांना नक्की आवडेल पदार्थ
भारतात वडापाव नंतर अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे सामोसा. कुरकुरीत आणि आतून बटाटा, भाज्यांचे मिश्रण करून बनवलेला सामोसा चवीला अतिशय सुंदर लागतो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे सामोसा अतिशय आवडीने खातात. पण नेहमीच तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे रक्तात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. कायमच तेलकट सामोसा खाल्ल्यामुळे लहान मुलांना खोकला होण्याची शक्यता असते. पण आज आम्ही तुम्हाला तेलाचा अजिबात वापर न करता कुरकुरीत स्वादिष्ट पिझ्झा सामोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पिझ्झा समोसा घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. हा पदार्थ तुम्ही एअर फ्रायरमध्ये किंवा ओव्हनमध्ये सहज बनवू शकता. कमीत कमी साहित्यात बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय लहान मुलांच्या पार्टीत तेलकट पदार्थ नको असल्यास तुम्ही एअर फ्रायरमध्ये बनवलेला पिझ्झा सामोसा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)