प्रथिनांनी समृद्ध असलेले काळ्या चण्यांचे पौष्टिक कटलेट, घरच्या घरी नक्की बनवून पहा हेल्दी नाश्तातील पदार्थ
सकाळच्या नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर काळे चणे शिजवून खाल्ले जातात. चणे खाल्ल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते. यामध्ये असलेले फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. वजन वाढल्यानंतर ते कमी करताना आहारात वेगवेगळे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये तुम्ही काळ्या चण्यांचा सुद्धा समावेश करू शकता. यामुळे पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. प्रथिनांनी समृद्ध असलेले काळे चणे केवळ शिजवूनच नाहीतर त्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काळ्या चण्यांचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे कटलेट लहान मुलांच्या डब्यात किंवा पार्टी स्नॅक्स म्हणून सुद्धा ठेवू शकता. केवळ काळे चणेच नाहीतर तुम्ही यात विविध भाज्या आणि कढधान्यांचा सुद्धा वापर करू शकता. नेहमीच नाश्त्यात तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही काळ्या चण्यांचे कटलेट बनवून खाऊ शकता. या पदार्थासोबत हिरवी चटणी किंवा सॉस सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया काळ्या चण्याचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)
Dinner Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचल नाही? मग झटपट घरी बनवा मसालेदार ‘सोया पुलाव’






