Morning Breakfast Recipe : सकाळचा नाश्ता टेस्टी आणि पोटभरणीचा असेल तर दिवस चांगला जातो. आज आम्ही तुमच्यासोबत एक सोपी आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी शेअर करत आहोत. याची चव लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडेल.
(फोटो सौजन्य: Youtube)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
सकाळचा नाश्त्यात काही वेगळं बनवायचं तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच.
आज आपण टेस्टी आणि कुरकुरीत असा नाश्ता कसा बनवायचा ते जाणून घेणार आहोत.
हा नाश्ता झटपट बनतो आणि चवीलाही मजेदार लागतो.
दररोज सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल तर पोहा-आलू क्रिस्पी बाइट्स हा उत्तम पर्याय आहे. पोहे, बटाटा आणि बेसन यांच्या साध्या मिश्रणातून तयार होणारा हा नाश्ता बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतो. विशेष म्हणजे हा पदार्थ आधी तयार करून फ्रिजमध्ये साठवून ठेवता येतो आणि गरजेनुसार तळून झटपट सर्व्ह करता येतो. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपीचहासोबत किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी अगदी योग्य आहे.
सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुवून काही मिनिटे भिजत ठेवा. पोहे मऊ झाल्यावर ते हाताने चांगले मॅश करून घ्या.
त्यामध्ये बेसन आणि पाणी घालून एकसारखे मिश्रण तयार करा. दुसरीकडे बटाटा किसून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे आणि आले-लसूण पेस्ट परता. त्यानंतर किसलेला बटाटा घालून थोडा वेळ शिजवा.
आता चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, तीळ, ओवा, काळी मिरी, कलौंजी, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करा.
यानंतर पोहा-बेसनचे मिश्रण आणि कोथिंबीर घालून मंद आचेवर सतत हलवत शिजवा. मिश्रण घट्ट होऊन कढई सोडू लागले की ते तेल लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटात पसरवा. काही मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून सेट होऊ द्या.
मिश्रण पूर्णपणे सेट झाल्यावर त्याचे चौकोनी किंवा त्रिकोणी तुकडे करा. गरम तेलात हे तुकडे सोनेरी आणि
कुरकुरीत होईपर्यंत तळा. तयार झालेले पोहा-आलू क्रिस्पी बाइट्स हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
कापलेले कच्चे बाइट्स एअरटाइट डब्यात भरून फ्रिजमध्ये 3 ते 4 दिवस साठवता येतात. गरजेनुसार तळून ताजे आणि कुरकुरीत नाश्ता तयार करता येतो.
जाहिरात
जाहिरात
Web Title: Make a crispy morning breakfast using poha potatoes and besan note the recipe in marathi