
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत पनीर बटाट्याचे कबाब
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय खावे? असे अनेक प्रश्न महिलांना कायमच पडतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा दिवाळीच्या फराळातील पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर चमचमीत आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट पनीर बटाट्याचे कुरकुरीत कबाब बनवू शकता. कबाब हा पदार्थ व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही पदार्थांपासून बनवला जातो. याशिवाय कबाब तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पनीर बटाटा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)