Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

वजन कमी करताना दीर्घकाळ उपाशी राहण्याऐवजी सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बीट गाजर टिक्की बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2026 | 10:03 AM
नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

Follow Us
Follow Us:

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा सतत काहींना काही करत असतात. कधी आहारात बदल केला जातो, तर कधी महागडा डाएट घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. शरीरावर वाढलेला चरबीचा घेर योग्य पद्धतीने कमी केल्यास आरोग्य चांगले राहण्यासोबतच शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. झपाट्याने वजन कमी करण्यासाठी अनेक लोक तासनतास उपाशी राहतात, पण असे केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरातील ऊर्जा नष्ट होऊन थकवा, अशक्तपणा वाढू शकतो. त्यामुळे वजन कमी करताना पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीट गाजरची टिक्की बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर कोणत्याही वेळी तुम्ही खाऊ शकता. बीट खाल्ल्यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते तर गाजरच्या सेवनामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया बीट गाजरची टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कच्चे बीट खाल्ल्यानंतर पचन होत नाही? मग झटपट बनवा बीटरूट सॅलड, अशक्तपणा- रक्ताची कमतरता निघेल भरून

साहित्य:

  • बीट
  • गाजर
  • बटाटा
  • कांदा
  • मटार
  • कोथिंबीर
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • कॉर्नफ्लावर
  • बेसन
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • चाट मसाला
  • तेल
संध्याकाळ होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स, प्रत्येक घासात लागेल भन्नाट चटकदार चव

कृती:

  • बीट गाजर टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात बटाटा आणि बीट शिजवण्यासाठी ठेवा. २ किंवा ३ शिट्ट्या काढून गॅस बंद करा.
  • थंड झाल्यानंतर बटाटा आणि बीटची साल काढून बारीक किसून घ्या. यामुळे टिक्कीचे मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल.
  • मोठ्या वाटीमध्ये बटाटा आणि बीट घेऊन त्यात किसून घेतलेले गाजर घाला. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात लाल तिखट, हळद, चाट मसाला आणि गरम मसाला, बेसन, कॉर्नफ्लावर घालून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणाच्या तुमच्या आवडीनुसार टिक्की बनवा आणि पॅनमधील गरम तेलात दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या बीट गाजरच्या टिक्की. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Make healthy and tasty beetroot carrot tikkis for breakfast they aid in weight loss while providing the body with essential nutrients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Weight loss

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.