संध्याकाळ होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स, प्रत्येक घासात लागेल भन्नाट चटकदार चव
राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाचे वातवरण झाले आहे. सतत पडणाऱ्या पाऊसामुळे सगळीकडे थंडगार वातावरण झाले आहे. पाऊस पडल्यानंतर सगळ्यांच्या चहासोबत काहींना काही गरमागरम चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. वडापाव, कांदाभजी तर कधी विकतचे पदार्थ आणून सुद्धा खाल्ले जातात. पण नेहमीच काहीतरी वेगळे पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स बनवू शकता. मशरूमपासून बनवलेला हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही या पद्धतीने चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स बनवू शकता. वेगवेगळ्या भाज्या, मसाले आणि चीजचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा चांगला आहे. अनेकांना मशरूमची चव अजिबात आवडत नाही. पण या पद्धतीने जर तुम्ही मशरूम बनवलात तर घरातील सगळेच खूप आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






