Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारातली थंड पेय पिणे कायमचे जाल विसरून! शरीर आतून थंड ठेवण्यासाठी घरीच बनवा पान-गुलकंद सरबत, नोट करा रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पान गुलकंद सरबत बनवून प्यावे. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल. जाणून घ्या पान गुलकंद सरबत बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2026 | 03:25 PM
शरीर आतून थंड ठेवण्यासाठी घरीच बनवा पान-गुलकंद सरबत

शरीर आतून थंड ठेवण्यासाठी घरीच बनवा पान-गुलकंद सरबत

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला काहींना काही थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दही, ताक, लस्सी, कोल्ड्रिंक, सोडा यांच्यासह बाजारात उपलब्ध असलेले पॅक बंद फळांचे सरबत सुद्धा प्यायले जातात. पण नेहमीच पॅक बंद फळांचे ज्यूस ;कोल्ड्रिंक किंवा सोडा असलेले पेय पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. यामुळे पचनासंबंधित गंभीर आजार सुद्धा होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पान गुलकंद सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. विड्याच्या पानांचा वापर करून बनवलेले सरबत चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात खूप जास्त उष्णता वाढते आणि घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून गेल्यामुळे थकवा, अशक्तपणा येतो. अशावेळी कोणतेही विकतचे कोल्ड्रिंक किंवा सरबत पिण्याऐवजी घरी बनवलेले थंडगार पान गुलकंद सरबत बनवून प्यावे. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होईल आणि शरीराला भरमसाट फायदे होतील. विड्याचे पान खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. तर गुलकंद खाल्ल्यामुळे पोटात थंडावा राहील. पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी गुलकंद खावे. चला तर जाणून घेऊया पान गुलकंद सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात टिकून राहील थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलकंद, गॅस अपचनाचा त्रास होईल नाहीसा

साहित्य:

  • विड्याची पाने
  • मध किंवा साखर
  • गुलकंद
  • बडीशेप
  • वेलची पावडर
  • दूध
  • बर्फाचे तुकडे
लहान मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक आणि टेस्टी इडली चाट, शाळेचा डबा होईल पूर्णपणे रिकामी

कृती:

  • पान गुलकंद सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, विड्याची पाने स्वच्छ धुवून त्यांचे मध्यम आकारात तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात कापून घेतलेली विड्याची पाने, बडीशेप, वेलची आणि साखर घालून बारीक वाटून घ्या.
  • गुळगुळीत पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात गुलकंद, दूध आणि बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • काचेच्या ग्लासाला आतून मध लावून तयार केलेले सरबत ओतून वरून सजावटीसाठी गुलकंद टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पान गुलकंद सरबत.

Web Title: Make pan gulkand juice at home to keep the body cool from inside summer healthy drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
1

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
2

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.