Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी

Butter Chicken Recipe : रेस्टाॅरंटमध्ये मिळणारे बटर चिकन तर सर्वांच्याच आवडीचे ठरते. तुम्हाला माहितीये का? ही डिश तुम्ही घरी देखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार करु शकता. आता बटर चिकन खायला रेस्टाॅरंटला जाऊ नका, तर घरीच हा पदार्थ बन

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2026 | 09:35 AM
Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार 'बटर चिकन', रेसिपी आहे फार सोपी

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार 'बटर चिकन', रेसिपी आहे फार सोपी

Follow Us
Follow Us:
  • लोकप्रिय भारतीय पदार्थांमध्ये बटर चिकनचे नाव हमखास घेतले जाते.
  • लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव फार आवडते.
  • आज आपण रेस्टाॅरंटची ही डिश घरी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत.
भारतीय खाद्यसंस्कृतीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीची डिश म्हटली तर बटर चिकनचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.  उत्तर भारतातून प्रसिद्ध झालेली ही रेसिपी आज जगभरातील भारतीय रेस्टॉरंट्सच्या मेनूमध्ये आवर्जून दिसते. घरी बटर चिकन बनवताना अनेकदा रेस्टॉरंटसारखी चव, रंग आणि क्रीमीपणा मिळत नाही. मात्र योग्य प्रमाणात मसाले, चिकनचे मॅरिनेशन आणि ग्रेव्हीची योग्य पद्धत वापरली तर घरच्या घरीही अगदी हॉटेलसारखे बटर चिकन तयार करता येते. ही डिश बटर नान, तंदुरी रोटी, पराठा, जिरा राईस किंवा साध्या भातासोबतही तितकीच स्वादिष्ट लागते. खास पाहुण्यांसाठी, वाढदिवस, पार्टी किंवा विकेंड स्पेशल मेनूमध्ये ही रेसिपी नक्कीच सर्वांचे मन जिंकते.

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी

साहित्य

चिकन मॅरिनेट करण्यासाठी

  • ५०० ग्रॅम बोनलेस चिकन
  • १/२ कप दही
  • १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून धने-जिरे पूड
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १ टेबलस्पून लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • १ टेबलस्पून तेल
ग्रेव्हीसाठी
  • ३ मोठे टोमॅटो
  • १२–१५ काजू
  • २ टेबलस्पून बटर
    १ टेबलस्पून तेल
  • १ तमालपत्र
  • २ वेलदोडे
  • १ छोटा दालचिनी तुकडा
  • १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  • १ टीस्पून धनेपूड
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १ टीस्पून कसुरी मेथी
  • १/२ कप फ्रेश क्रीम
  • १ टीस्पून साखर
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, धने-जिरे पूड, गरम मसाला, लिंबाचा रस, मीठ आणि तेल एकत्र करून त्यात चिकन घाला. नीट मिक्स करून किमान १ ते २ तास मुरण्यासाठी ठेवा.
  • पॅनमध्ये थोडे बटर किंवा तेल गरम करून मॅरिनेट केलेले चिकन मध्यम आचेवर ८ ते १० मिनिटे शिजवा. चिकन पूर्ण शिजल्यावर बाजूला ठेवा.
  • टोमॅटो आणि काजू थोड्या पाण्यात १० मिनिटे उकळा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये अगदी गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • कढईत बटर आणि तेल गरम करून त्यात तमालपत्र, वेलदोडा आणि दालचिनी परता. नंतर आले-लसूण पेस्ट घालून सुवास येईपर्यंत परता. आता तयार टोमॅटो-काजूची पेस्ट घालून ८ ते १० मिनिटे शिजवा.
  • ग्रेव्हीत लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, साखर आणि मीठ घालून चांगले मिसळा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून ग्रेव्हीला योग्य घट्टपणा द्या.
  • शिजवलेले चिकन ग्रेव्हीत घालून ८ ते १० मिनिटे मंद आचेवर उकळी येईपर्यंत शिजवा, जेणेकरून चिकनमध्ये ग्रेव्हीची चव पूर्णपणे मुरेल.
  • शेवटी कसुरी मेथी हाताने चुरून घाला. त्यानंतर फ्रेश क्रीम आणि थोडे बटर मिसळा. दोन मिनिटे मंद आचेवर शिजवून गॅस बंद करा.
  • गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन बटर नान, लच्छा पराठा, तंदुरी रोटी, जिरा राईस किंवा साध्या वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करा. वरून थोडी फ्रेश क्रीम आणि बटर घातल्यास डिश अधिक आकर्षक आणि स्वादिष्ट दिसते.

Web Title: Make restaurant style butter chicken at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • chicken
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी

साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी
2

साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी
3

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी

Potato Cheese Balls: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! बनवा क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्स; नोट करा सोपी रेसिपी
4

Potato Cheese Balls: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! बनवा क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्स; नोट करा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.