Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: २० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा स्ट्रीट स्टाईल रगडा चाट, सकाळच्या नाश्त्यासाठी वनपॉट रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रीट स्टाईल रगडा चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 16, 2026 | 08:00 AM
२० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा स्ट्रीट स्टाईल रगडा चाट

२० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा स्ट्रीट स्टाईल रगडा चाट

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी सकाळच्या नाश्त्यात काहींना काही चटकदार आणि चमचमीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी बाहेरून विकत आणलेले चाट किंवा पाणीपुरी खाल्ली जाते. पण कायमच प्रक्रिया केलेले आणि शिळे अन्नपदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले ताजे अन्नपदार्थ खावेत. ताज्या आणि घरी बनवलेल्या पदार्थांमध्ये योग्य प्रमाणात मसाले आणि इतर सर्वच पदार्थ टाकले जातात. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात खाण्यासाठी स्ट्रीट स्टाईल रगडा चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंबटगोड चिंच चटणी आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेली रेसिपी चवीला अतिशय सुंदर लागते. रगडा चाट तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. स्वच्छ पद्धतीने बनवलेली रगडा चाट चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. त्यामुळे कायमच बाहेरील विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रगडा चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार

साहित्य:

  • पांढरे वाटाणे
  • बटाटा
  • चिंच चटणी
  • हिरवी चटणी
  • टोमॅटो
  • हळद
  • चाट मसाला
  • कांदा
  • लाल तिखट
  • जिरं पावडर
  • धणे पावडर
  • शेव
  • कोथिंबीर
हिरव्यागार पेरूंपासून झटपट बनवा चमचमीत पेरूची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

कृती:

  • रगडा चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेले वाटाणे, बटाटा, टोमॅटो, हळद, मीठ, लाल मिरची पावडर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावा.
  • वाटाणे व्यवस्थित शिजण्यासाठी कुकरच्या ३ ते ४ शिट्ट्या काढून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर त्यातील बटाटा आणि टोमॅटो काढून घ्या आणि वाटाणे चमच्याने मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात मिरची पावडर, जिरे पावडर, धणे पावडर, चाट मसाला आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेला रगडा वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यावर हिरवी चटणी, चिंच चटणी, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि बारीक शेव घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला स्ट्रीट स्टाईल रगडा चाट. हा पदार्थ लहान मुलं अतिशय आवडीने खातील.

Web Title: Make street style ragda chaat in 20 minutes with this easy recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
1

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’
2

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

पावसाळ्यातील थंडगार वातावरणात प्या गरमागरम शेवगा-दुधीचे सूप; सर्दी खोकल्यापासून मिळेल आराम, राहाल कायमच फ्रेश
3

पावसाळ्यातील थंडगार वातावरणात प्या गरमागरम शेवगा-दुधीचे सूप; सर्दी खोकल्यापासून मिळेल आराम, राहाल कायमच फ्रेश

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी
4

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.