Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

Rice Pakoda Recipe : घरात उरलेला भात असेल तर त्यापासून झटपट आणि कुरकुरीत पकोडे/भजी तयार केले जाऊ शकतात. खमंग चवीचे ही भजी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी योग्य पर्याय ठरतात आणि यामुळे अन्नाची नासाडीही होत नाही. 

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2026 | 09:20 AM
Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत 'राईस पकोडे'

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत 'राईस पकोडे'

Follow Us
Follow Us:
  • उरलेल्या भाताचा स्वादिष्ट आणि झटपट उपयोग.
  • बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि चविष्ट पकोडे.
  • संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी उत्तम पर्याय.
घरात उरलेला भात अनेकदा फ्रिजमध्ये पडून राहतो आणि दुसऱ्या दिवशी तो खाण्याचा कंटाळा येतो. पण याच उरलेल्या भातापासून काही मिनिटांत तयार होणारे कुरकुरीत पकोडे हा एक स्वादिष्ट आणि झटपट पर्याय आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेले हे पकोडे/भजी चहासोबत खायला अप्रतिम लागतात. कमी साहित्य, कमी वेळ आणि उत्तम चव यामुळे ही रेसिपी प्रत्येक घरात सहज बनवता येते.

नेहमीच्या डोशाला द्या हटके ट्विस्ट! लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चॉकलेट डोसा, नोट करून घ्या रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही हा एक उत्तम पर्याय ठरतो. उरलेल्या भाताचा योग्य वापर करून अन्नाची नासाडी टाळण्यासही ही रेसिपी मदत करते. शिवाय आताच्या पावसाळी वातावरणात तर ही रेसिपी सर्वांनाच खुश करणारी ठरेल.

साहित्य

  • १ कप उरलेला शिजवलेला भात
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ ते २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ½ कप बेसन
  • २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • ½ टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून हळद
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार थोडे पाणी
  • तळण्यासाठी तेल
पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात उरलेला भात घ्या आणि तो हलक्या हाताने मोकळा करून घ्या.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा.
  • आता बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा.
  • मिश्रण कोरडे वाटल्यास त्यात थोडेसे पाणी घाला. मात्र मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
  • कढईत तेल गरम करा. तेल पुरेसे तापल्यानंतर मिश्रणाचे छोटे-छोटे पकोडे तेलात सोडा.
  • मध्यम आचेवर पकोडे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तयार पकोडे टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या. गरमागरम पकोडे हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा मसाला चहासोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Make tasty and crispy pakoda from leftover rice recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
2

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
3

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
4

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.