पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी
दैनंदिन आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. फळांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते. नियमित एक किंवा दोन केळी खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते. बऱ्याचदा बाजारात गेल्यानंतर घरात मोठ्या प्रमाणावर विकतची फळे आणून फ्रिजमध्ये ठेवली जातात. मात्र पूर्ण पिकलेली केळी दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहत नाही. पिकलेली केळी आतून पूर्णपणे मऊ होतात. अशावेळी पिकलेल्या केळ्यांपासून नेमकं काय बनवावं सुचत नाही. पिकलेल्या केळींपासून शिकरण किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पिकलेल्या केळींपासून खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली केळीची खीर खाल्ल्यानंतर इतर काहीच खाण्याची अजिबात गरज भासणार नाही. विकत आणलेली फळे फेकून देण्याऐवजी फळांपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर नेहमीच मिठाई खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Chocolate: दररोज चॉकलेट खाणे आरोग्यदायी आहे का? ठरू शकते आरोग्यासाठी घातक, काय आहे सत्य






