साबुदाणे खाण्याऐवजी पचनास हलकी असलेली दह्याची कढी नक्की बनवून पहा.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. आज राज्यभरात सगळीकडे आषाढी एकादशी साजरी केली जात आहे.तसेच या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी नेमका काय पदार्थ खावा असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. बऱ्याच घरांमध्ये साबुदाण्याची खिचडी बनवली जाते. पण साबुदाणे पचनास जड असतात. उपवासाच्या दिवशी साबुदाणे किंवा बटाट्याची भाजी बनवून खाल्यास अपचन किंवा पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी पचनास हलके आणि चवीला स्वदिष्टय असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया उपवासाची कढी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)






