Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mango: ‘फळांचा राजा’ ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या अतिप्रमाणात आंबे खाण्याचे दुष्परिणाम

Side effects Of eating Too Many Mangoes: आंबा हा पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ असला तरी त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अतिप्रमाणात आंबे खाल्ल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 25, 2026 | 07:23 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘फळांचा राजा’ आरोग्यासाठी धोकादायक
  • अतिप्रमाणात आंबे खाण्याचे दुष्परिणाम
  • अशी घ्या काळजी
उन्हाळा सुरू होताच बाजारात रसाळ, गोड आणि सुगंधी आंब्यांची रेलचेल दिसू लागते. ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा आंबा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता असतो. मात्र, चवीला स्वादिष्ट असलेला हा आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. वजन वाढण्यापासून ते मधुमेह, पोटाचे त्रास आणि त्वचेच्या समस्यांपर्यंत अनेक दुष्परिणाम अतिप्रमाणात आंबे खाल्ल्याने होऊ शकतात. त्यामुळे आंब्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्याने आरोग्यवर कोणते दुष्परिणाम होतात, जाणून घ्या.

Weight Loss Tips: व्यायाम करुनही वजन कमी होत नाहीये? मग ‘या’ सामान्य चुका टाळा

वजन वाढण्याचा धोका

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जास्त आंबे खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात आणि वजन वाढू शकते. विशेषतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आंब्याचे सेवन नियंत्रित ठेवावे.

मधुमेहींसाठी धोकादायक

मधुमेही रुग्णांनी आंबे मर्यादित प्रमाणात खाणे आवश्यक आहे. आंब्यातील साखरेमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त आंबे खाणे टाळावे.

पोटाच्या समस्या वाढू शकतात

अति प्रमाणात आंबे खाल्ल्यास अपचन, गॅस, पोटदुखी आणि अतिसार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यातच रिकाम्या पोटी आंबा खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

शरीरातील उष्णता वाढते

आंब्याचा स्वभाव उष्ण मानला जातो. त्यामुळे जास्त आंबे खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढून पिंपल्स, नाकातून रक्त येणे किंवा अस्वस्थता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

ऍलर्जी आणि घशाची जळजळ

काही लोकांना आंब्यामुळे त्वचेची ऍलर्जी, खाज किंवा पुरळ येऊ शकतात. तसेच जास्त आंबे खाल्ल्याने घसा खवखवणे किंवा जळजळ होण्याची शक्यता असते. रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे अधिक हानिकारक ठरू शकतात.

आंबे खाताना अशी घ्या काळजी

  • आंबे खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा.
  • मर्यादित प्रमाणातच आंब्याचे सेवन करावे.
  • मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार घ्यावा.
  • रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे खाणे टाळा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cockroach Control Tips: घरात झुरळांचा सुळसुळाट? करा कायमचा बंदोबस्त, फॉलो करा ‘हे’ प्रभावी घरगुती उपाय

Web Title: Mango side effects health risks of eating too many mangoes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

World Thyroid Day: थायरॉईडचा ‘सायलेंट गेम’; थकवा, वजन बदल…;  शरीर देत असलेल्या ‘या’ इशाऱ्यांकडे दुर्लक्ष नको, अशी ओळखा लक्षणे
1

World Thyroid Day: थायरॉईडचा ‘सायलेंट गेम’; थकवा, वजन बदल…; शरीर देत असलेल्या ‘या’ इशाऱ्यांकडे दुर्लक्ष नको, अशी ओळखा लक्षणे

Benefits Of Jamun: शरीराला मिळेल नैसर्गिक थंडावा! जाणून घ्या जांभूळ खाल्ल्याने शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे
2

Benefits Of Jamun: शरीराला मिळेल नैसर्गिक थंडावा! जाणून घ्या जांभूळ खाल्ल्याने शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

पोट स्वच्छ होऊन सुद्धा जडपणा जाणवतो? आतड्यांना सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
3

पोट स्वच्छ होऊन सुद्धा जडपणा जाणवतो? आतड्यांना सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
4

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.