Weight Loss Tips: व्यायाम करुनही वजन कमी होत नाहीये? मग ‘या’ सामान्य चुका टाळा
झुरळे गटारे, कचरा आणि घाणेरड्या जागांमध्ये फिरत असल्यामुळे त्यांच्याद्वारे जंतू आणि जीवाणू घरात पसरतात. ते अन्न व भांड्यांवर चढल्याने पोटदुखी, अतिसार, अन्नातून विषबाधा, ॲलर्जी आणि दम्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना याचा अधिक धोका असतो.
झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी बोरिक ॲसिड हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. बोरिक ॲसिडमध्ये पीठ आणि साखर मिसळून छोटे गोळे तयार करावेत. हे गोळे स्वयंपाकघरातील कोपरे, सिंकखाली किंवा स्टोव्हच्या मागे ठेवावेत. साखरेमुळे झुरळे आकर्षित होतात आणि बोरिक ॲसिडमुळे ती नष्ट होतात.
झुरळांना तीव्र वास आवडत नाही. त्यामुळे कडुलिंबाचे तेल, पुदिन्याचे तेल किंवा लवंग यांचा वापर फायदेशीर ठरतो. फरशी पुसताना पाण्यात काही थेंब कडुलिंब किंवा पुदिन्याचे तेल टाकल्यास झुरळे दूर राहतात. तसेच, कापसावर पुदिन्याचे तेल लावून स्वयंपाकघरात ठेवल्यासही चांगला परिणाम दिसतो.
घरात घाण साचू न देणे हे झुरळ नियंत्रणाचे सर्वात महत्त्वाचे स्टेप आहे. सिंक कोरडे ठेवणे, अन्न झाकून ठेवणे, कचरा नियमित साफ करणे आणि भिंतींमधील किंवा पाईपांभोवतीच्या भेगा बंद करणे आवश्यक आहे. घर स्वच्छ राहिल्यास झुरळे टिकून राहू शकत नाहीत.
घरगुती उपाय आणि नियमित स्वच्छता यांच्या मदतीने झुरळांवर सहज नियंत्रण मिळवता येते. मात्र समस्या जास्त वाढल्यास प्रोफेशनल कीटक नियंत्रण सेवा घेणे अधिक प्रभावी ठरते. स्वच्छ आणि निरोगी घरासाठी झुरळांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही.
Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश






