Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्किन्सन आजाराशी लढा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन ‘स्मार्ट’ aDBS यंत्रणेमुळे हालचालींवरील नियंत्रण होणार सोपे

मेडट्रॉनिक या आरोग्‍यसेवा तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीच्‍या कंपनीने आज भारतात अॅडप्टिव्ह डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजेच एडीबीएस यंत्रणेच्‍या लाँचची घोषणा केली आहे. समकालीन डीबीएस यंत्रणेमध्‍ये केलेली सुरुवात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 24, 2026 | 05:51 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पार्किन्सन आजार नेमका काय असतो?
  • रिअल-टाइम बदल घडवून आणण्यासाठी डिझाइन
  • भारतात पार्किन्सन आजाराच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ
Parkinsons Treatment : मेडट्रॉनिक या आरोग्‍यसेवा तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीच्‍या कंपनीने आज भारतात अॅडप्टिव्ह डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजेच एडीबीएस यंत्रणेच्‍या लाँचची घोषणा केली आहे. समकालीन डीबीएस यंत्रणेमध्‍ये केलेली ही एक नाविन्यपूर्ण सुधारणा आहे, जेथे, पार्किन्सन आजाराने पीडित असलेल्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा अधिक सुधारणे हा यामागचा उद्देश आहे.

धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसाच्या Cancer चा धोका? कीटकनाशकांचा दीर्घकालीन संपर्क ठरू शकतो घातक; संशोधनात नेमकं काय?

पार्किन्सन आजार नेमका काय असतो?

पार्किन्सन हा एक प्रगत मज्जासंस्थेशी संबंधित आजार आहे, जो व्यक्तीच्या हालचालींवर आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम करू शकतो. काळासह यामुळे चालणे, लिहिणे किंवा दैनंदिन वस्तू पकडणे यांसारख्या सामान्य कृती करणे अधिक कठीण होऊ शकतात. हालचालींशी संबंधित आव्हाने ही सर्वात स्पष्टपणे दिसून येत असली, तरी हा आजार संवाद साधणे, झोप आणि एकूणच स्वास्थ्यासारख्या दैनंदिन जीवनाच्या इतर पैलूंवरही परिणाम करू शकतो. आजच्या काळात, या आजाराची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत. स्‍पेशालिस्‍ट्सद्वारे रुग्णाची वैयक्तिक गरज आणि वैद्यकीय मूल्यमापन लक्षात घेऊन या उपचार पद्धतींमध्ये काळानुसार बदल केले जातात.

गरजेनुसार रिअल-टाइम बदल घडवून आणण्यासाठी डिझाइन

डीप ब्रेन स्टिम्युलेशन सारखे उपचार पर्याय सध्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये दिवसभरात स्टिम्युलेशन लेव्हल्सचे मॅन्युअल समायोजन करावे लागते. हे सहसा रुग्ण किंवा त्यांच्या केअरगिव्‍हर्सना करावे लागते. मेडट्रॉनिकचे एडीबीएस तंत्रज्ञान रुग्णाची प्रकृती किंवा औषधांच्या गरजेनुसार रिअल-टाइममध्ये बदल घडवून आणण्यासाठी डिझाइन केले आहे, ज्यामुळे लक्षणांचे अधिक सातत्यपूर्ण व्यवस्थापन होण्यास मदत होते. या एडीबीएस यंत्रणेमध्‍ये BrainSense™ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्याला अमेरिकेच्या अन्‍न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे.
अॅडप्टिव्ह डीप ब्रेन स्टिम्युलेशन हे मेंदूतील signals किंवा रुग्णाच्या हालचालींमधील बदलांनुसार आपोआप उपचार बदलण्यासाठी डिझाइन केले आहे. रिअल-टाइममध्ये प्रतिसाद देऊन लक्षणांवर अधिक सातत्यपूर्ण नियंत्रण मिळवणे, दुष्परिणाम कमी करणे आणि शरीरात बसवलेल्या डिवाईसच्या बॅटरीचे आयुष्य वाढवणे, हे या यंत्रणेचे उद्दिष्ट आहे.

भारतात पार्किन्सन आजाराच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ

भारतात पार्किन्सन आजाराच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा असताना आणि पुढील पाच वर्षांत ही संख्या जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचा अंदाज असताना ‘aDBS’ प्रणालीची ओळख अत्यंत निर्णायक वेळी झाली आहे. जरी सध्या पार्किन्सनसारख्या आजारांवर कोणताही पूर्ण उपचार उपलब्ध नसला, तरी ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ (DBS) गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून पार्किन्सन आणि इतर मज्जासंस्थेशी संबंधित विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचे जीवन आमूलाग्र बदलून टाकत आहे.
डीबीएसमध्ये छातीच्या त्वचेखाली पेसमेकरसारखे एक छोटे डिवाईस बसवले जाते, जे मेंदूच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागाला इलेक्ट्रॉनिक सिग्नल पाठवते. रुग्णाला आराम देण्यासाठी हे सिग्नल संदेशांना रोखतात, ज्यामुळे पार्किन्सनची हालचालींशी संबंधित लक्षणे निर्माण होतात.

भारतातील रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी

या प्रसंगी मेडट्रॉनिक इंडियाच्या न्यूरोसायन्स अँड स्पेशालिटी थेरपीजचे सीनियर डायरेक्‍टर प्रतीक तिवारी म्हणाले, “भारतात पार्किन्सन आजार वाढती आरोग्य समस्या बनत आहेत, ज्‍यामुळे आम्‍हाला हे प्रगत तंत्रज्ञान येथे लाँच करताना अत्यंत अभिमान वाटत आहे. वेदना कमी करणे, आरोग्य उत्तम ठेवणे आणि आयुष्य वाढवणे हे आमचे नेहमीच ध्येय राहिले आहे आणि या यंत्रणेच्‍या सादरीकरणामधून त्या मोहिमेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. हा टप्पा पार्किन्सन आजाराचा वाढता भार कमी करण्यातील आमच्‍या समर्पिततेची पुष्टी देतो, तसेच भारतातील रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्याधुनिक आरोग्य तंत्रज्ञान आणण्यामधील आमचे नेतृत्व देखील प्रबळ करतो.” पार्किन्सनसारख्या आजाराचा भार जसजसा वाढत जाईल, तसतसे अधिक चांगल्या उपचारांची उपलब्धता वाढवण्यासाठी, वैद्यकीय तज्ज्ञांना सखोल अंतर्दृष्टीद्वारे साहाय्य करण्यासाठी आणि अंतिमतः देशभरातील रुग्णांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गुंतवणूक करणे अत्यावश्यक ठरेल.

डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) घेण्याचा विचार करणाऱ्या रुग्णांनी सुरुवातीला मूव्हमेंट डिसऑर्डर स्पेशालिस्ट, जे सहसा न्यूरोलॉजिस्ट असतात, यांचा सल्ला घेणे आवश्यक असते. हे तज्ज्ञ या थेरपीचा रुग्णाला फायदा होईल का, याचे मूल्यमापन करतात. डीबीएस प्रक्रिया समन्वित आणि सांघिक दृष्टिकोनावर आधारित असते, ज्यामध्ये पुढील तपासणीसाठी रुग्णांना अनेकदा सर्वसमावेशक डीबीएस क्लिनिक किंवा न्यूरोसर्जरी बोर्डकडे पाठवले जाते. रुग्ण या उपचारांसाठी योग्य वाटला, तर हे शस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष प्रशिक्षित असलेले फंक्शनल न्यूरोसर्जन केअर टीमसोबत मिळून शरीरात डिवाईस बसवण्याचे आणि त्याचे प्रोग्रामिंग करण्याचे काम करतात.

Pregnancy मध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास होते नॉर्मल डिलिव्हरी? काय आहे तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा

Web Title: Medtronic adbs technology parkinsons treatment india marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • health
  • health awareness
  • health care news
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
1

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर
2

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
4

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.