दुधात मिक्स करून प्या 'हे' पदार्थ
राज्यभरात सगळीकडे वातावरणात गारवा वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. साथीचे आजार झाल्यानंतर किंवा इतर अनेक कारणांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी एक ग्लास दुधात पौष्टिक पदार्थ मिक्स करून प्यावे. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. नियमित दूध प्यायल्यामुळे सर्दी, खोकला इत्यादी आजारांपासून शरीराचा बचाव होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी एक ग्लास दुधात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ मिक्स करून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हळदीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेले कर्क्यूमिन शरीरात होणारी जळजळ आणि बॅक्टेरियाशी लढण्यासाठी मदत करते. एक ग्लास गरम दुधात चिमूटभर हळद मिक्स करून प्यायल्यास घसादुखी, सर्दी आणि अंगदुखीपासून आराम मिळतो. शिवाय साथीच्या आजारांमुळे कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
थंडीच्या दिवसांमध्ये दुधात मध मिक्स करून प्यायल्यामुळे घसा खवखवणे, घशात होणारी जळजळ थांबते आणि खोकला कमी होतो. मधाचे दूध प्यायल्यामुळे रात्रीच्या वेळेस चांगली झोप लागते. यामध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
आल्याचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. शिवाय यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये आल्याचे सेवन करावे.
किमतीने महाग असलेले केशर आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले गुणधर्म शरीराचा थंडीपासून बचाव करतात. केशर खाल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. त्यामुळे एक ग्लास दुधात दोन ते तीन काड्या केशर टाकून प्यावे.
पौष्टीक गुणधर्मनी समृद्ध असलेले बदाम खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये विटामिन ई आणि भरपूर पोषक घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. हिवाळ्यात बदाम खाल्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराला ताकद मिळते.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
भारतीय मसाल्यांमध्ये दालचिनी पावडरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. दालचिनीमध्ये असलेले गुणधर्म साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करतात. दुधात दालचिनी पावडर मिक्स करून प्यायल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.