बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीरासाठी ठरेल अतिशय गुणकारी
शरीर कायमच निरोगी राहण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन, व्यायाम, ध्यान, भरपूर पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराची काळजी घ्याल जास्त वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. धावपळीच्या जीवनशैलीत शरीराची काळजी घेण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास बीटच्या रसाचे सेवन करावे. बीटचा रस प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. बीटचा रस आरोग्यासाठी वरदान आहे. यामध्ये लोह, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्व सी, फायबर तसेच अँटी ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास बीटचा रस प्यायल्यास आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल.(फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना बीटचा रस प्यायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना बीटची भाजी, सॅलड किंवा सरबत बनवून पिण्यास देऊ शकता. यामुळे मुलांच्या शरीराला भरपूर पोषण मिळेल. बीटचा रस प्यायल्यामुळे शरीराची ताकद वाढते आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित बीटच्या रसाचे सेवन करावे. यामुळे नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यानंतर शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो, अशावेळी उपाशी पोटी महिनाभर नियमित बीटचा रस प्यायल्यास शरीराला भरपूर ताकद आणि शक्ती मिळेल.
बीटचा रस केवळ आरोग्यासाठीच नाहीतर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा प्रभावी ठरतो. अँटी ऑक्सिडंट्स आणि विटामिन सी त्वचेमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे त्वचेवर चमकदार ग्लो येतो आणि चेहरा अतिशय सुंदर दिसतो. चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी करण्यासाठी बीटचा रस प्यावा. यामुळे त्वचेवर वाढलेला काळे डाग, पिगमेंटेशन आणि त्वचेच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळतो. केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि केसांच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बीट, गाजर आणि सफरचंद रस प्यावा.
शरीरात साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल हृदयाला हानी पोहचवते. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानंतर कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्यामुळे बीटचा रस नियमित प्यायल्यास शरीरात जमा झालेली घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल. यामध्ये असलेले नायट्रेट्स रक्तवाहिन्या स्वच्छ करते. शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी खेळाडू नियमित बीटच्या रसाचे सेवन करतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि कधीच बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.