प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या लग्नात काहींना काही छान करण्याची इच्छा असते. आई आपल्या मुलांच्या सुखासाठी अनेक गोष्टी करत असते. अशाच शुभेच्छा नीता अंबानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांना दिल्या आहेत.लवकरच राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. काही दिवसांआधी मार्चमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग जामनगरमध्ये पार पडले. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात नीता अंबानी यांनी बोलताना राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी या सोहळ्यात आपल्या मनातील दोन इच्छा व्यक्त केल्या आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं काय म्हणाल्या नीता अंबानी?
नीता अंबानी यांनी व्यक्त केलेल्या इच्छा:
अनंत अंबानी हा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे. नीता अंबानी म्हणाल्या, मला माझ्या मुलाचे प्री-वेडिंग गुजरातमध्ये करायचे होते. गुजरातमध्ये आपण सगळे एकत्र आलो आहोत. जिथे मुकेश आणि त्याच्या वडिलांनी रिफायनरी बांधली होती. अनंत आणि राधिकाच्या लग्नाआधीचे सर्व सोहळे गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडले. दुसरी इच्छा व्यक्त करताना कला आणि नृत्याची आवड असलेल्या नीता अंबानी म्हणाल्या, हा संपूर्ण उत्सव कला आणि संस्कृतीमध्ये पार पडावा, अशी इच्छा नीता अंबानी यांनी व्यक्त केली.
[read_also content=”मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कीटोन पातळी वाढली, म्हणजे नक्की काय https://www.navarashtra.com/lifestyle/chief-minister-arvind-kejriwals-ketone-levels-rise-what-exactly-does-that-mean-539410.html”]
राधिका मर्चंटला पहिल्यांदा पाहिल्यानंतर नीता अंबानी काय म्हणाल्या?
नीता अंबानी या कोरोडोच्या मालकीण आहेत. नीता अंबानी यांनी पहिल्यांदा राधिका मर्चंट यांना पाहिलं तेव्हा त्या म्हणाल्या, जेव्हा मी पहिल्यांदा राधिकाला भेटले तेव्हाच माहित होत की अनंतला त्याची जीवनसाथी भेटली आहे. मला आणखीन एक मुलगी मिळाली आहे जी केवळ माझ्या नृत्याबद्दल प्रेम व्यक्त करत नाही, तर माझ्या मुलाबद्दलचे प्रेम देखील व्यक्त करेल. पुढे बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, राधिका, अंबानीची मुलगी म्हणून आम्ही तुझे स्वागत करतो. तू फक्त अनंतची सोबती नाहीस, तर एक प्रेमळ मुलगी, बहीण, काकू, मावशी आणि आम्हा सर्वांसाठी जीवनाचा प्रकाश आहेस.