भर रस्त्यात नागिन डान्स अंगलट! लखनऊ हायवेवर तरुणींचा राडा; पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये दिला इशारा, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय केलं तरुणींनी?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी हायववेर रिल बनवत आहे. दोघीही नागिन डान्स करत आहे. आजूबाजूने मोटारसायक, ट्रक, चारचाकी गाड्या जात आहेत. तरुणींच्या या कृत्याने लोक पाहतच राहिले आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांना याचा चांगलाच दणका बसला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊ-कानपूर हायवेवर घडली आहे.
पोलिसांची फिल्मी कारवाई
दरम्यान व्हिडिओ व्हायरल होताच उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली आहे. या मुलींना भारीभरकम दंड ठोठावण्यात आला असून पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये व्हिडिओला उत्तर दिले आहे. यूपी पोलिसांनी व्हिडिओ सोशल मीडियावर एडिट करुन पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक सफेरा बिन वाजवत आहे आणि नंतर या तरुणी नागिन डान्स करत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये लिहिले आहे की, नागिन स्टेप परफेक्ट था, पर लोकेशन फ्लॉप। सपेरा आया… और शो स्टॉप।
व्हायरल व्हिडिओ
नागिन स्टेप परफेक्ट था,
पर लोकेशन फ्लॉप।
सपेरा आया… और शो स्टॉप। 🚨#RoadSafety pic.twitter.com/SZjXhhLtxZ — UP POLICE (@Uppolice) February 22, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यूपी पोलिसांनी अधिकृत अकाऊंटवर @Uppolice शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. एका नेटकऱ्याने आता नागिण फणफणार नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने नागिन अपना बदला जरूर लेती है असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






