Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे नेपाळ-चीन सीमेलगतचा परिसर हादरला आहे. या भागात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक का येतात, यामागे काही खास कारणे आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2026 | 08:10 AM
नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का होते?

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का होते?

Follow Us
Follow Us:
  • हिमालय आणि ट्रेकिंगचं मोठं आकर्षण
  • कैलास मानसरोवर यात्रेचा महत्त्वाचा मार्ग
  • निसर्ग, मठ आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पूराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेपाळ-चीन सीमेलगत ग्लेशियर फुटल्याने अचानक भीषण पूर आला आणि अनेक भाग उद्ध्वस्त झाले. परदेशी पर्यटकांसह देशातील स्थानिक लोकांना याचा मोठा फटका बसला. यात स्थानिकांचे आर्थिक नुकसानही झाले. नेपाळ पर्यटन बोर्डनुसार, बेपत्ता झालेल्या लोकांमध्ये ५१७ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. यात भारतासहित ३० हून अधिक देशातील नागरिकांचा समावेश होतो. अशात आता प्रश्न असा पडतो की, नेपाळच्या या दुर्गम आणि पर्वतीय भागात इतके पर्यटक नक्की कशासाठी गेले होते? चला जाणून घेऊया.

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

हिमालयाचे आकर्षण

नेपाळ जगातील सर्वात उंच पर्वतांचे घर आहे आणि हेच कारण आहे की अनेक साहसी पर्यटक आणि ट्रेकर्स नेपाळला भेट द्यायला येतात. जगातील सर्वात मोठे शिखर माऊंट एव्हरेस्ट व्यतिरिक्त इथे लांगटांग, अन्नपूर्णा, मानसलू आणि इतर पर्वतीय प्रदेश आहेत जे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. ट्रेकिंग हा देशातील अर्थव्यावस्थेतील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. नेपाळ सरकारच्या आकडेवारीनुसार, २०२४ साली ११.४७ लाखाहून अधिक परदेशी पर्यटकांनी नेपाळला भेट दिली होती. पूरप्रवण रसुवा जिल्हा देखील याच कारणास्तव महत्त्वाचा आहे. स्याफ्रुबेसी आणि तिमुरे यांसारखी ठिकाणे लांगटांग व्हॅली आणि तामांग हेरिटेज ट्रेलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांवर आहेत. हा परिसर तिबेटला जाणाऱ्या प्रवाशांसाठी देखील एक महत्त्वाचा मार्ग आहे.

कैलास मानसरोवर यात्रेचा रस्ता

या भागात परदेशी पर्यटकांच्या उपस्थितीचे आणखी एक कारण म्हणजे धार्मिक पर्यटन. नेपाळच्या रस्त्यात मोठ्या संख्येने भारतीय आणि इतर देशातील तीर्थयात्री कैलास मानसरोवराची यात्रा करत असतात. नेपाळ-चीन सीमेलगतचा मार्ग या यात्रेतील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. हेच कारण आहे की, अचानक आलेल्या या पूरात फक्त स्थानिकच अडकले नाही तर परदेशातील अनेक पर्यटक देखील या परिस्थितीला बळी पडले.

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

नेपाळमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे

परदेशी पर्यटकांसाठी नेपाळ म्हणजे फक्त एव्हरेस्ट फिरण्याचे ठिकाण नाही. याव्यातिरिक्त इथे बर्फाच्छादित पर्वत, सरोवरे, बौद्ध मठ, हिंदू मंदिरे, जंगले आणि ग्रामीण संस्कृती या सर्व गोष्टींचा अनुभव घेता येतो. अनेक पर्यटक शहरांपासून दूर लहान गावात होमस्टे किंवा स्थानिक जीवनाचा अनुभव घेण्यासाठी इथे येतात. सुवा प्रदेशातील गोसाईकुंडासारखी धार्मिक आणि नैसर्गिक स्थळे देखील अनेक पर्यटकांना इथे येण्यासाठी आकर्षित करत असतात. यामुळेच पूरग्रस्त भागात पर्यटकांची उपस्थिती काही हैराण करणारे ठरले नाही. हा परिसर नेपाळमधील लोकप्रिय पर्यटक भाग असल्याने भारतासह परदेशातील अनेक पर्यटक इथे आढळून आले.

 

Web Title: Nepal flood tourist destinations himalaya kailash mansarovar travel news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • nepal
  • Nepal Flood
  • travel news

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार
1

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार

Nepal Flood Damage : नेपाळमध्ये निसर्गाचा तांडव! सगळीकडे हाहाःकार… पूरग्रस्त देश सावरण्यासाठी 48000 कोटींची गरज
2

Nepal Flood Damage : नेपाळमध्ये निसर्गाचा तांडव! सगळीकडे हाहाःकार… पूरग्रस्त देश सावरण्यासाठी 48000 कोटींची गरज

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”
3

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप! महापुरात इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!
4

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप! महापुरात इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.