गरोदरपणाचा काळ महिलांसाठी खूप अविस्मरणीय असतो. या काळात महिला अनेक गोष्टींचा अनुभव घेत असतात. या काळात महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. महिलांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागते. कारण असं केलं नाही तर तुमच्या आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच गरोदर महिला या दोन जीवाच्या असतात, त्यांना स्वत: सोबत आपल्या बाळाची काळजी घेणे गरजेचे असते. आणि ती घेतली पाहिजे.