नीता अंबानी यांचा बनारसी साडी लुक
अंबानी कुटुंबातील सर्व महिला स्टाईलच्या बाबतीत पुढे आहेत. मग ते नीता अंबानी असोत वा त्यांची सून. पण, अनेक प्रसंगी त्यांच्यात फॅशन क्लॅशही पाहायला मिळतो. जिथे कधी सासूचं तर कधी सुनेचं पारड जड झालेलं दिसून येतं. नुकतीच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल येथे नीता अंबानी यांची फॅशन पुन्हा एकदा पाहायला मिळाली. Annual Day साठी नीता अंबानी यांनी देशी लुक निवडला होता.
नीता अंबानी यांच्या साड्या नेहमीच चर्चेत असतात आणि यावेळीदेखील त्यांची प्रिंटेड बनारसी साडी ही चर्चेत आली आहे. अत्यंत क्लासी आणि रॉयल अशा या बनारसी साडीत नीता यांचे सौंदर्य खूपच सुंदर आणि उठावदार दिसत होते. पहा नीता अंबानी यांचा हा क्लासी लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
नीता यांची क्रीम रंगाची साडी
प्रिंटेड बनारसी साडी लुक
नीता अंबानी यांनी त्यांच्या नातवंडांच्या शाळेच्या वार्षिक समारंभात सहभागी होण्यासाठी क्रीम रंगाची बनारसी साडी नेसली होती. सुंदर निळ्या रंगाची ही बनारसी सिल्क साडी खूपच अप्रतिम दिसत होती. ज्यावर केशरी आणि गुलाबी रंगाची सोनेरी प्रिंट असलेली फुले सुंदर दिसत होती. ही साडी दिसायला अत्यंत रॉयल आणि क्लासी दिसून येत आहे. तर नीता अंबानी यांनी ही अत्यंत एखाद्या रॉयल राणीप्रमाणे कॅरी केली आहे. ही बनारसी प्रिंटेड साडी नक्कीच काही लाखांमध्ये असेल यात शंका नाही. स्वदेश या ब्रँडच्या साड्या नीता अंबानी अधिक नेसताना दिसतात.
केसांचा Volume होईल क्लास, Nita Ambani च्या हेअरस्टायलिस्टने शेअर केली पद्धत
रॉयल दागिने
साडीला मॅचिंग ठरणारे रॉयल दागिने
नीता अंबानी आपल्या प्रत्येक लुकमध्ये सुंदर दागिन्यांसह स्टाइल करताना दिसतात, त्यामुळे इथेही त्या मागे राहिलेल्या दिसल्या नाहीत. त्यांनी या क्लासी साडीसह ड्रॉप इअरिंग्ज, डबल लेअर्ड आकर्षक खड्यांचा नेकलेस, मॅचिंग ब्रेसलेट आणि बोटात एक मोठी हिऱ्याची अंगठी घातली होती. नेहमीच साडीवर त्या लहानशी मरून टिकली लावत आपला देशी लुक पूर्ण करताना दिसतात
हेअरस्टाईल आणि मेकअप
क्लासी हेअरस्टाईल आणि न्यूड मेकअप
नीता अंबानी यांनी या साडीसह केस मोकळे सोडले होते आणि केसांना खालून थोडा कर्ल लुक दिला होता. एका बाजूला भांग पाडत साडीवर योग्य मॅच होईल अशीच हेअरस्टाईल त्यांनी केली होती. तर नेहमीप्रमाणे नैसर्गिक दिसेल असा मेकअप त्यांनी केला. न्यूड मेकअपचा अधिकाधिक वापर त्या करताना दिसतात. फाऊंडेशन, हायलायटर, स्मोकी आईज, काजळ, मस्कारा, आयलायनर, ग्लॉसी न्यूड लिपस्टिकचा त्यांनी वापर करून आपल्या सौंदर्यात भर घातली आहे.
नीता अंबानींचे कपडे डिझाइन करते ‘ही’ फॅशन डिझायनर; हजारो कोटींच्या संपत्तीची आहे मालकीण!
साधेपणा
याशिवाय नीता अंबानी नेहमीच फोटोग्राफरशीदेखील संवाद साधताना आणि त्यांना आवर्जून जेऊन जा असं सांगताना दिसतात आणि यावेळीदेखील तोच प्रत्यय आला. कायम सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या नीता अंबानींचा लुक हा नेहमीच स्टायलिश आणि पाहत राहण्यासारखा असतो आणि यावेळीदेखील त्यांनी आपल्या चाहत्यांना नाराज केले नाही.