नीता अंबानी यांचा शाही हैदराबादी सूटमधील खास लूक
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा राधिका मर्चंट हिच्या सोबत पार पडणार आहे. अंबानी कुटुंबातील धाकट्या मुलाचे लग्न असल्याने विवाह सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी त्यांचा विवाह सोहळा शाही थाटात पार पडणार आहे. अनंत राधिकाच्या संगीत सोहळ्यानंतर काल त्यांचा हळदी सोहळा पार पडला. हळदी समारंभासाठी जगभरातील अनेक उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्यासह इतर पाहुण्यांना देखील बोलावण्यात आले होते.
हळदी समारंभात अनंत राधिकासह कुटुंबातील सर्व लोकांचे आकर्षक लूक समोर आले आहेत. नवरी मुलीच्या लुकपेक्षा सगळ्यात जास्त चर्चा ही वरमाईच्या लूकची होत आहे. नीता अंबानी या नेहमीच त्यांच्या आकर्षक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. नीता अंबानी यांनी हळदी समारंभात घातलेल्या शाही हैदराबादी सूटची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. विवाह सोहळ्यात नवरी मुलीपेक्षा नीता अंबानी यांचा लूक अधिक उठावदार आणि सुंदर दिसत आहे.
अनंत राधिकाच्या हळदी समारंभासाठी निता अंबानी यांनी शाही हैदराबादी सूट परिधान केला होता. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लूकमध्ये त्यांच्या सौंदर्य अधिक खुलून आले आहे. नीता अंबानी यांनी परिधान केलेला हैदराबादी सूट प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी तयार केला आहे. या सूटवर अँटिक गोल्ड लावण्यात आले आहे. तसेच हा सूट आणखीन उठावदार दिसण्यासाठी आयकॉनिक खडा दुपट्टाची जोड आहे. या सूट वर करण्यात आलेले बारीक नक्षीकाम, अँटिक जरी वर्क, एव्हरग्रीन जरदोजी एम्ब्रॉयडरी वापरून हा सूट तयार करण्यात आला आहे.
नीता अंबानी यांनी परिधान केलेला सूट तयार करण्यासाठी खास कारागीर बोलावण्यात आले होते. सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर हिने नीता अंबानी यांचा मेकअप केला होता. तर हेअर स्टायलिस्ट रितिका कदम यांनी त्यांची सुंदर ओपन हेअर हेअर स्टाईल केली होती. नीता अंबानी यांनी या सूटवर चांदबली कानातले आणि मांग टिक्का परिधान केला होता.